News Flash

महाविद्यालयीन वसतिगृहात करोनाचा शिरकाव

भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थ्यांचा अहवाल करोना सकारात्मक आला आहे.

संग्रहीत

तीन विद्यार्थी बाधित; मुखपट्टीचा वापर देखाव्यापुरता

नाशिक : शहरासह जिल्ह्यात करोना संसर्गात वाढ होत असून महाविद्यालयीन परिसरातही त्याचा शिरकाव झाला आहे. भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थ्यांना करोना झाल्याचे उघड झाले असून एका विद्याथ्र्याचा अहवाल प्रलंबित आहे. शैक्षणिक संस्थांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचा दावा होत असतांना विद्यार्थ्यांमधील बेफिकिरी ठळकपणे दिसत आहे. विद्यार्थी के वळ देखावा म्हणून मुखपट्टीचा वापर करत असून वर्गात बसण्यापेक्षा महाविद्यालयीन आवारातील उपाहारगृह तसेच अन्य मोकळ्या जागेत गर्दी करत आहेत.

जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा आतापर्यंत एक लाख १६ हजार ६२३ वर पोहचला असून नाशिक महापालिका क्षेत्रात एक हजार ५०० रुग्ण उपचार घेत आहेत. महाविद्यालये आता नियमीत सुरू झाली असल्याने करोनाला रोखण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, मुखपट्टीचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाविद्यालय प्रशासन निर्जंतुकीकरणासह सामाजिक अंतर नियमांचे पालन काटेकोरपणे करत असल्याचा दावा करत असले तरी विद्यार्थी मात्र हे नियम धाब्यावर बसवत आहेत. विद्यार्थ्यांची उपहारगृह, कटट्यावर गर्दी होत आहे. या गर्दीत करोनाचा शिरकाव सहज होत आहे.

भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थ्यांचा अहवाल करोना सकारात्मक आला आहे. एका विद्याथ्र्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य दोन विद्यार्थी जे संपर्कात होते त्यांना वसतिगृहातच विलगीकरण करण्यात आले आहे. एका विद्याथ्र्याचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून २६ विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालकांशी चर्चा करून त्यांना विलगीकरणात ठेवायचे की घरी पाठवायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. महाविद्यालयीन परिसरात करोनाचा शिरकाव झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे शहरातील भि.य.क्ष. महाविद्यालयात गुरूवारी गुणपत्रके  घेण्यासाठी तसेच परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी के ली. सुरक्षित अंतर पथ्याचा त्यांना विसर पडला. अशीच परिस्थिती अन्य महाविद्यालयांमध्येही दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:22 am

Web Title: corona virus infection entery infiltrates college dormitories akp 94
Next Stories
1 ओळखपत्रासाठी महिना अखेरपर्यंत सदस्यांची माहिती द्या
2 सेनेची खेळी त्यांच्यावर उलटविण्याचा भाजपचा प्रयत्न
3 राष्ट्रीय ऑनलाइन गुलाब पुष्प स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
Just Now!
X