नाशिक : करोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्यापही निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आलेले नाहीत. करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी त्रासदाकय ठरणार असल्याचा धोका लक्षात घेता मंगळवारी नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा ऑनलाइन पद्धतीने झाला. या वेळी ऑनलाइन का होईना शिक्षकांची भेट झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फु लला. पहिल्याच दिवशी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना करोनाविरोधात काळजी घ्या, घरी रहा, विनाकारण बाहेर पडू नका, अशा सूचना करण्यात आल्या.

मंगळवारी पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅप, मेलवर शाळेचे वेळापत्रक पाठवत त्या अनुषंगाने लिंक पाठविण्यात आली. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ऑनलाइन का होईना, आपले मित्र भेटणार म्हणून ते वेळापत्रकानुसार वर्ग सुरू होण्याआधीच तयार होऊन बसले. वर्ग सुरू होताच अनौपचारिक गप्पा सुरू झाल्या. सुट्टीमध्ये काय के ले, कोणाला काय त्रास झाला, अभ्यास कोणी के ला, करोनाविरोधात काळजी कशी घ्यायची, याची माहिती देण्यात आली. पालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले.

नव्या अभ्यासक्र मातील पहिला धडा हसत खेळत मुलांनी गिरवला. महापालिके च्या विद्यार्थ्यांनीही शाळेचा पहिला दिवस ऑफलाइन साजरा के ला. यंदा पुस्तके  न मिळाल्याने पहिल्या दिवशी वह््या, पुस्तकांची जुळवाजुळव सुरू राहिली. शिक्षकांनी काही ठिकाणी घरी जात विद्यार्थ्यांशी  संवाद साधला. दरम्यान, शाळास्तरावर पहिली ते नववी तसेच इयत्ता ११वीसाठी ५० टक्के   शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. १०वी आणि १२वीमधील शिक्षकांना १०० टक्के  उपस्थिती बंधनकारक आहे. करोना संसर्गामुळे पुढील सूचना येईपर्यंत शाळा ऑनलाइन सुरू राहतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.