News Flash

करोनाच्या पुढील लाटेसाठी सज्ज राहा

करोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरासह जिल्ह्यत खाटांची संख्या कमी असतांना आपण ती मोठय़ा प्रमाणात वाढविली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांची सूचना

नाशिक : करोनाची पुढील लाट येण्याआधी आरोग्य सुविधांदृष्टय़ा आपली तयारी ठेवावी लागेल. करोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी देताना रेमडेसिविरचा वापर आवश्यक असेल तरच करावा. शक्यतो त्याचा वापर टाळण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

सोमवारी येथे नामको रुग्णालय संचालित आर.एम.डी. करोना काळजी केंद्राचे उदघाटन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजबळ बोलत होते.

नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अवघ्या १० दिवसांत नामको रुग्णालयात करोना उपचार केंद्र सुरू करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त के ले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी दुपटीने रुग्णसंख्या वाढली असल्याने औषधे आणि प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असतांनाही आवश्यक त्या सोयीसुविधा शासन, प्रशासन आणि सेवाभावी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. करोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरासह जिल्ह्यत खाटांची संख्या कमी असतांना आपण ती मोठय़ा प्रमाणात वाढविली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात आवश्यक असलेल्यांना प्राधान्याने मदत करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्राणवायू साठा मुबलक प्रमाणात साठवून करोना केंद्राचे काम सुरू  ठेवावे. कडक र्निबधांचा परिणाम अतिशय चांगला होत असून रुग्णसंख्या कमी होण्यासाठी त्यांचा अतिशय फायदा होत आहे. या के ंद्रामुळे कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने याचा भविष्यात देखील उपयोग होणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद के ले.

यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी नामको चॅरिटेबल हॉस्पिटल आणि बँकेच्या माध्यमातून सामाजिक कार्य अविरतपणे सुरू असून करोनाच्या काळात प्राणवायूबाबत योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.  यावेळी नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख, माजी आमदार वसंत गीते, विजय साने, हेमंत धात्रक, अशोक साखला आदी उपस्थित होते.

नामको करोना उपचार केंद्रातील सुविधा

नामको विश्वस्त मंडळाने अत्यंत कमी कालावधीमध्ये आठ बायपॅप व्हेंटिलेटरसह आठ खाटांचा अतिदक्षता विभाग आणि प्राणवायू सुविधेसह ४२ खाटांचा करोना कक्ष उभारला आहे. या केंद्रात आरोग्यविषयक सुविधांसह  करमणुकीसाठी टीव्ही, पिण्याचे गरम आणि थंड पाणी, प्रशिक्षित निवासी डॉक्टर, कर्मचारीवर्ग, आरोग्यदायी आहार आदी सुविधा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:37 am

Web Title: corona wave nashik bujbal doctors ssh 93
Next Stories
1 आठवडाभरात विभागात करोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत १० हजारांची घट
2 जिल्ह्य़ातील सर्व शासकीय रुग्णालयांत प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारावेत – छगन भुजबळ
3 ताहाराबाद प्राथमिक केंद्रात आता करोना रुग्णालय
Just Now!
X