News Flash

नोटीस देण्याचे प्रयोजन न समजण्यासारखे!

करोना चाचणीत प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब होत आहे किंवा कसे याबाबत सक्षम यंत्रणांकडून खातरजमा करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भूमिका

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : करोना चाचणीत प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब होत आहे किंवा कसे याबाबत सक्षम यंत्रणांकडून खातरजमा करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. जोपर्यंत याबाबत खातरजमा होत नाही तोपर्यंत करोना तपासणी सुरू ठेवणे अयोग्य आहे, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेशातील बाबींवर पूर्तता करून उत्तर देण्याऐवजी वेगळ्या प्रकारे नोटीस देणे अथवा भूमिका घेण्याचे प्रयोजन समजून येत नसल्याचे म्हटले आहे.

करोनाचे चुकीचे अहवाल दिल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी मांढरे यांनी दातार जेनेस्टिकवर चाचण्या करण्यावर बंदी घातल्यानंतर संबंधित प्रयोगशाळेने मानहानी प्रकरणी ५०० कोटींचा दावा दाखल करण्याचे सुतोवाच करीत केंद्रीय प्रयोगशाळेकडून नमुन्यांची तपासणी करावी, त्यात विसंगती आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे आव्हान दिले आहे. करोना चाचणीतील तफावतीच्या मुद्यावरून खासगी प्रयोगशाळा आणि जिल्हा प्रशासन यांच्यात वादाला तोंड फुटले आहे. दातार जेनेस्टिकला प्रशासनाने पुढील आदेश होईपर्यंत चाचण्या बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ही प्रयोगशाळा कायमस्वरुपी बंद का करू नये, याबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दातार प्रयोगशाळेने प्रशासनाला खरे अहवाल अडचणीत ठरत असल्याने आम्ही चाचण्या बंद करीत असल्याचे म्हटले आहे. यावर जिल्हाधिकारी मांढरे यांनी उपरोक्त आदेश कार्यपध्दतीचा अवलंब होतो की नाही याची खातरजमा करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. सर्वच व्यवस्थांची बांधिलकी नागरिकांशी आहे हे विसरता कामा नये. आणि त्याच दृष्टीने हे आदेश पारित करण्यात आले. करोना काळात प्रशासन तसेच अनेक संस्था, आस्थापना काम करीत आहेत. करोना विषयक कोणत्याही मुद्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्या त्या वेळेला त्याचे निराकरण करणे सर्वाचे कर्तव्य आहे. प्रत्यक्षात रुग्ण बाधित असताना अहवाल सकारात्मक दिला गेल्यास त्याचे किती गंभीर परिणाम संबंधित व्यक्ती, त्याच्या कुटुंबीयांवर, एकंदरीतच करोना निर्णय प्रक्रियेवर होऊ  शकतात हे देखील सर्वाना ज्ञात आहे. त्यामुळे असा संभ्रम निर्माण झाला तर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून तो दूर करणे हे आवश्यक आहे. त्यामुळे आदेशातील बाबींवर पूर्तता करून योग्य उत्तर पाठवले गेल्यास प्रकरणात पुढील यथोचित निर्णय घेणे सुकर होईल. असे असताना वेगळ्या प्रकारे नोटिसा देण्याचे अथवा भूमिका घेण्याचे प्रयोजन समजून येत नसल्याचे मांढरे यांनी नमूद के ले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:56 am

Web Title: coronavirus collector sooraj mandhare has expressed his thoughts on notice dd 70
Next Stories
1 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेचा कार्यक्रम स्थगित
2 नाशिक जिल्ह्य़ात गिधाडांची संख्या वाढतेय!
3 खासगी सुरक्षारक्षकांऐवजी संयोजकांची पोलिसांवर भिस्त
Just Now!
X