करोना संसर्गवाढीची पार्श्वभूमी

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून रुग्णांची संख्या एक लाख २६ हजार ५७० पर्यंत पोहचली आहे. राज्यात करोना उद्रेक असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश होत असल्याने शहरात दाखल झालेल्या के ंद्रीय पथकाने मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना कक्षासह महापालिके च्या रुग्णालयांची पाहणी केली.

जिल्ह्य़ात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहता प्रशासकीय पातळीवर र्निबध अधिक कडक करण्यात आले आहेत. राज्यातील करोना उद्रेक असलेल्या शहरात नाशिकचाही समावेश होत आहे. मागील वर्षी मार्चमध्ये करोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. सप्टेंबरमध्ये रुग्ण संख्या वाढत असताना मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु, फे ब्रुवारीनंतर करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. दिवसाला ३०० ते ३५० रुग्ण नव्याने दाखल होत आहेत. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून करोनाविषयक नियम पाळण्याकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा संसर्गवाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. विशेषत: राजकीय मंडळींशी संबंधित कार्यक्र मांमध्ये होणारी गर्दी आणि त्या विरोधात प्रशासनाकडून होत नसलेली कारवाई चिंतेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या घरातील विवाह सोहळ्यास लोटलेली गर्दी, राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मुखपट्टीला देण्यात आलेली तिलांजली, मंगळवारी झालेल्या महापालिके तील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत पुन्हा निवड झाल्यानंतर भाजपचे गणेश गिते यांच्या समर्थकांकडून जल्लोष करताना करोना नियमांकडे के लेले दुर्लक्ष, ही परिस्थिती सर्वसामान्यांकडून दंड वसूल करणारी यंत्रणा उघडय़ा डोळ्यांनी हताशपणे पाहत आहे. अशा घटना करोना संसर्गवाढ होण्यास बळ देणाऱ्याच आहेत. करोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी के ंद्राचे वैद्यकीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ज्यांचा रुग्णवाढीचा दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा संवेदनशील के ंद्राची पाहणी पथकाकडून होत आहे. तीन सदस्य असलेल्या पथकाने जिल्हा रुग्णालयात करोना कक्षाची पाहणी केली.

जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांपैकी ८२ खाटा भरल्या असून १८ खाटा रिकाम्या आहेत.  महापालिके च्याही आरक्षित खाटा असून प्राणवायू सिलिंडरची गरज भासलेले ५१ तर, व्हेंटिलेटरवर तीन रुग्ण आहेत. पथकाने रुग्णांची देखभाल कशा पद्धतीने होते, याची पाहणी के ली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली.  पथकाच्या वतीने ज्या ठिकाणी करोनाविषयक चाचण्या सुरू आहेत, अशा प्रयोगशाळेची तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची पाहणी करण्यात आली.