24 October 2020

News Flash

करोनाचा कहर : उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

जिल्ह्यत करोनाबाधितांची संख्या ७६ हजाराचा टप्पा गाठत असताना दुसरीकडे त्यातील ६६  हजार ३९१  रुग्ण उपचाराअंती बरे झाले.

लोकसता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यत करोनाबाधितांची संख्या ७६ हजाराचा टप्पा गाठत असताना दुसरीकडे त्यातील ६६  हजार ३९१  रुग्ण उपचाराअंती बरे झाले. करोनामुळे जिल्ह्यत १३७० जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यत आठ हजार ११५ रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी होत असताना त्यात पुन्हा अल्पशी वाढ झाली आहे.

जिल्ह्यतील करोना स्थितीची माहिती शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्ह्यत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. असे असले तरी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी उंचावत आहे. जिल्ह्यत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५० टक्के आहे. यात नाशिक शहरात ९१.७३ टक्के, ग्रामीण भागात ७७.८९, मालेगाव शहरात ८३.१४  टक्के तर जिल्हाबा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७२.०९ टक्के आहे. करोनामुळे ग्रामीण भागातील ४५०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७३८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५४  आणि जिल्ह्यबाहेरील २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात चार हजार १० रुग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक तालुक्यात ५१६, चांदवड १३९, सिन्नर ७२६, दिंडोरी २६१, निफाड ९२७, देवळा १२३, नांदगांव २२०, येवला ९३, त्र्यंबकेश्वर १२३, सुरगाणा ३२, पेठ २३, कळवण १२७, बागलाण २१८, इगतपुरी २३०, मालेगांव ग्रामीण २५२ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार ५१८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४७६  तर जिल्ह्यबाहेरील १११  रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 2:04 am

Web Title: coronavirus pandemic increase in corona patient corona kahar dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना उपचार खर्च कमी होण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जनजागृती
2 जिल्ह्यतील धरणसाठा ९५ टक्क्यांवर; १९ धरणे भरली, ५ अद्याप बाकी
3 कला शाखेतील घटत्या टक्क्यांमुळे अनेक महाविद्यालये अडचणीत
Just Now!
X