19 September 2020

News Flash

जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने ५६ हजारांचा टप्पा ओलांडला

आत्तापर्यंत १०९१ जणांचा मृत्यू

आत्तापर्यंत १०९१ जणांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने ५६ हजारांचा टप्पा ओलांडला असून यातील ४४ हजार ६८० रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. करोनामुळे आतापर्यंत १०९१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत १० हजार १६९ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहर, ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही उंचावत आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  ७८.८७ आहे. यात नाशिक ग्रामीणमध्ये ७४.५५ टेक्के, नाशिक शहरात ८२.१९, मालेगाव ७५.७९  तर जिल्हा बारुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५.५९ टक्के आहे.

करोनामुळे नाशिक ग्रामीणमध्ये ३२५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६०८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३२ आणि जिल्ह्याबाहेरील २६ अशा एकूण १०९१  रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. सध्या ग्रामीण भागात तीन हजार २४० रुग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक तालुका ४८०, चांदवड १४३, सिन्नर ३९४, दिंडोरी १५०, निफाड  ७४३, देवळा ४६, नांदगांव ३४४, येवला ११५, त्र्यंबके श्वर ३१, सुरगाणा दोन, पेठ नऊ, कळवण ७०,  बागलाण २७७, इगतपुरी १३५, मालेगांव ग्रामीण २९९ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पाच हजार २३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४९  तर जिल्ह्याबाहेरील ४६ रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:02 am

Web Title: covid 19 cases in nashik district crosses 56000 mark zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 मराठा आरक्षणासाठी आता लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ठिय्या
2 कांदा उत्पादकांचा जिल्ह्य़ात रास्ता रोको
3 प्रतिबंधित क्षेत्रात इमारती, बंगले, स्वतंत्र घरेच अधिक
Just Now!
X