राज्यात लॉकडाउन सदृश्य कडक निर्बंध असले, तरी करोना संसर्गाचा प्रसार आणि रुग्णवाढ यावर अपेक्षित परिणाम झाला नसल्याचेच चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वेगानं होत असून, रुग्णसंख्या वाढत आहे. आधीच आरोग्य सुविधांवर अतिरिक्त ताण येत असून, त्यात नव्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्याकडे कल वाढला असून, नाशिक शहरातही लॉकडाउन लावला जाणार आहे. १२ मेपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे.

दुसऱ्या लाटेमुळे देशात आणि राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरूवातीला नाईट कर्फ्यू व नंतर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले. मात्र, त्यामुळे करोना रुग्णवाढीला ब्रेक लागला असला, तरी त्यामध्ये घट झालेली नाही. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाचा संर्सग पोहोचल्यानं चिंता वाढली आहे. त्यामुळे आता जिल्हा स्तरावर कडक लॉकडाउनचा उपाय निवडला जात आहे. नाशिक शहरातील परिस्थितीही चिंता वाढवणारी असून, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

sawantwadi dodamarg wildlife corridor marathi news
मुंबई: सावंतवाडी दोडामार्ग परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करा, उच्च न्यायालयाचे केंद्र व राज्य सरकारला आदेश
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
police checked groom vehicle
शुभमंगल नंतर आधी सावधान! पोलिसांनी नवरदेवाच्या गाडीची घेतली झाडाझाडती; काय आहे नेमका प्रकार?
Pune, Pune Ring road
पुणे : आचारसंहितेमुळे रिंगरोडच्या भूसंपादनाला ब्रेक

नाशिक महापालिका आयुक्तांनी निर्णयाची माहिती दिली. १२ मेपासून शहरात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. दहा दिवसांसाठी लॉकडाउन असणार आहे. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता कडक लॉकडाउनची सुरूवात होईल. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाउनची मुदत संपेल. या कालावधीत सर्व सेवा आणि दुकानं बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही,” अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.