10 July 2020

News Flash

ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम तक्रारदारास परत

ऑनलाइन व्यवहारातील फसवणुकीत गेलेल्या एक लाख रुपयांपैकी ९१ हजार रुपये अवघ्या तीन दिवसात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवून दिले.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी

नाशिक : ऑनलाइन व्यवहारातील फसवणुकीत गेलेल्या एक लाख रुपयांपैकी ९१ हजार रुपये अवघ्या तीन दिवसात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवून दिले.

मनमाड येथील इंडियन ऑईल कंपनीत कामावर असताना काशिनाथ चव्हाण (रा. नाशिक) यांना एका व्यक्तीने दूरध्वनी केला. फोन पे कडून तुम्हांला रिवार्ड देण्यात येत असून ते मिळण्यासाठी तुम्हांला मी सांगतो त्याप्रमाणे प्रक्रिया करावी, असे सांगितले. त्याने चव्हाण यांना एक लिंक पाठवली. ती खुली करण्यास सांगण्यात आले. चव्हाण यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असता त्यांच्या एस.बी.आय. बँक खात्यातून एक लाख रुपये कपात झाल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी त्वरीत ही माहिती नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रमोद जाधव, शिपाई परिक्षित निकम आणि अन्य सहकाऱ्यांनी तक्रारदाराच्या खात्याची तांत्रिक माहिती घेऊन फिन विझार्ड, बॅलन्स, फिन्जम अशा ऑनलाईन पे वॉलेट नोडल यांना नोटीस दिली. त्यांच्याशी रात्री उशीरापर्यंत संपर्क साधत तक्रारदाराची फसवणूक झालेला एक लाख रूपयांचा व्यवहार थांबविण्यास सांगितले. त्यामुळे फसवणुकीतील एक लाखापैकी ९१ हजार १७३ रुपये तक्रारदाराच्या बँक खात्यात परत मिळवून देण्यात सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांना यश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:38 am

Web Title: crime news online fraud theft nashik gramin cyber police akp 94
Next Stories
1 पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे
2 विनाकरवाढ विकासकामे
3 बहुप्रतीक्षित बस सेवेला आगामी आर्थिक वर्षांचा मुहूर्त
Just Now!
X