17 January 2019

News Flash

दहा रूपयांचे नाणे गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दहा रुपयाचे नाणे गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदगिरी गावात घडली.

दहा रुपयांचे नाणे गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील चांदगिरी गावात घडली. शालिनी हांडगे असे मृत मुलीचे नाव असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अधिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसेजवळील चांदगिरी गावात राहणाऱ्या शालिनीने रविवारी दुपारी खेळता खळता दहा रुपयांचे नाणे गिळले होते. शालिनी सारखी रडत असल्याने पालकांनी तिला दहा रूपयांचे नाणे दिले होते. तेच नाणे तिने गिळले. त्यानंतर शालिनी झोपी गेली. मात्र, अचानक त्रास होऊ लागल्याने तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिने नाणे गिळल्याचे समोर आले. शालिनीवर रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

First Published on February 5, 2018 2:21 pm

Web Title: death of four and a half year old girl dies due to swallowing ten rupees coin in nashik