News Flash

नोटाबंदीविरोधात आज ‘वर्षश्राद्ध

काळा पैसा व भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे यासाठी ५०० व १००० च्या नोटा अवैध ठरविण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयास वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत सर्व सामान्य नागरिकांना झालेला त्रास, या नोटाबंदीतून काय साध्य झाले यावर र्सवकष विचार व्हावा यासाठी भाजपवगळता अन्य राजकीय पक्ष तसेच काही सामाजिक संघटनाच्या वतीने एकत्र येत नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात ‘वर्षश्राद्ध’चा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

काळा पैसा व भ्रष्टाचारावर नियंत्रण यावे यासाठी ५०० व १००० च्या नोटा अवैध ठरविण्यात आल्या. यामुळे अवैध धंद्यावर नियंत्रण तसेच दहशतवाद व हेरगिरीवर नियंत्रण येईल असा दावा मोदी यांनी केला होता. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे हाल अद्याप सुरू असून या विरोधात बुधवारी शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता रामकुंडावर  ५०० व १०००च्या नोटांच्या पहिल्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

तसेच नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतीय जनता पक्ष-शिवसेना या युती सरकारच्या नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयाविरोधात सकाळी ११ वाजता जिल्ह्य़ातील सर्व तहसील कार्यालयांवर ‘वर्षश्राद्ध’चा कार्यक्रम होणार आहे.

तसेच, सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर नोटाबंदीच्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जनस्वराज्य संघटनेच्या वतीने बुधवारी सकाळी ९ वाजता गंगाघाट परिसरात नोटाबंदीचे वर्षश्राद्ध होणार आहे. नोटाबंदीमुळे भारताचा जीडीपी रेशो हा ७.१ पर्यंत घसरला असून अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:39 am

Web Title: demonetization social organization
Next Stories
1 ‘समृद्धी’साठी राष्ट्रवादी, मनसेची मदत घेणार
2 ..अन् जिल्हा रुग्णालयाचे रूपडे पालटले
3 वाळूमाफियांचा तलाठय़ावर भर दिवसा हल्ला
Just Now!
X