28 February 2021

News Flash

करोना चाचणीसाठी विभागनिहाय केंद्रे

मंगळवारी स्थायी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

संग्रहीत छायाचित्र

स्थायीच्या बैठकीत निर्णय

नाशिक : करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने संशयितांची तपासणी आणि निदान लवकर होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन विभागनिहाय करोनाच्या चाचणीसाठी विभाग निहाय प्रत्येकी एक म्हणजे एकूण सहा केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. चार केंद्र आधीपासून सुरू असून त्यात नवीन दोनची भर घालून विभागनिहाय चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय, मध्यंतरी करोनाचा बंद केलेली शहरातील करोना काळजी केंद्र आवश्यकता भासल्यास पुन्हा कार्यान्वित करण्याचा विचार केला जात आहे.

मंगळवारी स्थायी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. आठवडाभरात शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यातील काही भागात आढळून आलेल्या नवा विषाणूचा वेगाने संसर्ग पसरतो. स्थानिक पातळीवर तसा विषाणू अद्याप आढळला नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेने प्रतिजन चाचण्या जवळपास बंद केल्या आहेत. सध्या केवळ तीन, चार ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केली जाते. सातपूर वा सिडकोतील रुग्णांना चाचणीसाठी बरेच लांब जावे लागते, अशी तक्रार काही सदस्यांनी केली. गंगापूरसह अन्य काही रुग्णालये बंद आहेत. विभागनिहाय चाचणी केंद्र कार्यान्वित झाल्यास संशयित रुग्णांची सोय होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले. त्या अनुषंगाने आता बिटको रुग्णालय, इंदिरा गांधी, डॉ. जाकीर हुसेन आणि सिडकोतील स्वामी समर्थ रुग्णालयासह सातपूर येथील मायको आणि शालिमार येथील आयएमए येथे चाचणीची व्यवस्था केली जाणार आहे.

७५ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात

मध्यंतरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर समाजकल्याण विभाग, ठक्कर डोम आणि मेरी येथील काळजी केंद्र बंद करण्यात आली होती. ही केंद्रे पुन्हा सुरू होतील काय, या प्रश्नावर गरज भासल्यास ती सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे स्थायी सभापती गणेश गिते यांनी सांगितले. दुसरीकडे ती तातडीने सुरू करण्याची गरज नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. शहरात १२६९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील ७५ टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:31 am

Web Title: department wise centers for corona testing akp 94
Next Stories
1 मुखपट्टीविना फिरण्यास पसंती; करोनाविषयक नियमांकडे दुर्लक्ष
2 ‘खर्डी एक्स्प्रेस रिंकी पावराच्या जिद्दीची कहाणी
3 दुकानांवर कारवाईचा बडगा
Just Now!
X