नाशिक : डीजेवर निर्बंध आल्यापासून ढोल-ताशा गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग झाला आहे. नाशिक ढोलचा दणदणाट तर सर्वदूर प्रसिध्द आहे. यंदाही गणरायाचे आगमन आणि विसर्जनाकरिता ढोल-ताशा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उत्सव काळातील ध्वनी प्रदूषण पाहता डीजेच्या दणदणाटाला मर्यादा घातल्या आहेत. पोलिसांकडूनही नियमांची ढाल पुढे केली जात असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांकडून पारंपरिक ढोल-ताशा पथकाला मिरवणुकीसाठी विशेष मागणी आहे.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

ढोल हे लोकवाद्य असून लोकसंगीताला कोणतेही नियम नसतात. त्यामुळे नवनव्या तालांसोबत, हलगी, संबळ, पखवाज हे पारंपरिक तसेच डिग्रेडू, जॅम्बे, ड्रम या पाश्चात्त्य वाद्यांतून निघणाऱ्या ध्वनिलहरी आणि ढोल-ताशाच्या ध्वनिलहरींचा संगम साधत बसविलेले नवे ताल यंदाच्या वर्षी वादनातील वेगळे वैशिष्टय़े राहणार आहे. हिंदी-मराठी गाण्यांसोबत गणेश आरती तसेच भांगडा, जोगवा, गरबा अशा नृत्यप्रकारांवर ताल रचलेले आहेत. यावर्षी प्रसिद्ध इंग्रजी गाण्यांवर रचलेले ताल तरुणांच्या आकर्षणाचा भाग ठरतील, असे महाराष्ट्र बीट्सचे उन्मेष गीते यांनी सांगितले.  आपल्या वादनाने शोभायात्रा, उत्सव मिरवणुका गाजवणारी ढोलपथके यंदा समाजमाध्यमेही दणाणून सोडणार आहेत. तरुणांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी तसेच पथकाला लोकप्रियता मिळावी या हेतूने यंदा पथकांनी आपले यु टय़ूब चॅनेल तसेच फेसबुक, इन्स्टाग्रामवर खाते सुरू करण्यावर भर दिला असल्याचे गीते यांनी नमूद केले.

ढोल-ताशाचा शास्त्रीय संगीतातील रागांशी संगम

यंदाच्या गणेशोत्सवात ढोल-ताशाचा शास्त्रीय संगीतातील रागांशी संगम घडवून नवीन ताल रचना ढोल पथकांनी तयार केली आहे. तबल्यावर वाजविण्यात येणारे आडवळणाचे रुद्र, सुनंद, रूपक या तालांचा या ढोलवादनात समावेश केला जाणार आहे. तसेच ढोल पथकांनी स्वत: रचलेल्या बंदिशीचे सादरीकरण यंदाच्या वादनात होणार आहे. भजनी ठेका, तोडे यासोबत रुद्ररुपा महादेवासारखी बंदिश यंदा प्रेक्षकांच्या कानावर येईल, असे तालरुद्रच्या अनिरुद्ध भूधर यांनी सांगितले.