नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे पेठ तालुक्यातील खरपडी-फणसपाडा या दुर्गम भागातील मुलांना अद्ययावत शिक्षण मिळावे यासाठी या गावातील शाळा डिजिटल करण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन १ मे रोजी होत आहे.
पेठ तालुक्यातील खरपडी-फणसपाडा हा आदिवासीबहुल दुर्गम परिसर. या ठिकाणी येण्या-जाण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षकही त्या ठिकाणी शिकविण्यास फारसे उत्सुक नसतात. पालकांना शिक्षणाचा गंध नाही. यामुळे बहुतांश विद्यार्थी शाळाबाह्य़ असल्याने शाळेची पटसंख्या ४० पुरती मर्यादित राहिली. नेचर क्लबने स्थानिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डिजिटल स्कूलची संकल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी शाळांच्या भिंतीवर गडकोट किल्ल्यांचे चित्र,
अत्याधुनिक एलईडी, संगणक आदी साहित्य प्रदान करण्यात आले. त्यांच्यासाठी खास अभ्यासक्रमही तयार करण्यात आला. बदललेली शाळा संपूर्णत: डिजिटलाइज असून १ मे रोजी क्लबचे पदाधिकारी, सभासदांसोबत या शाळेचे उद्घाटन होत आहे. यावेळी मुलांनी तयार केलेले वैज्ञानिक प्रयोग, आदिवासी नृत्य, गडकोट किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन भरविले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यास ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2016 1:26 am