23 October 2020

News Flash

ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

पेठमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

नाशिक : करोनाचे संकट वाढत असताना पेठ तालुक्यातील वाडी, वस्तीवर शाळा बंद आहेत. या मुलांनाभ्रमणध्वनीअभावी ऑनलाइन शिक्षणही दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत ३० गावांमध्ये घराघरात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सोशल नेटवर्किंग फोरमने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.

हे साहित्य फोरमच्या ग्रामसमन्वयकांनी (एसएनएफ) संकट काळात सामाजिक जबाबदारी निभावत जवळपास तीन हजार बालकांच्या घरापर्यंत पोहचवले. फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे यांच्या पुढाकाराने गाव तेथे एसएनएफ या अभियानात गावागावात सामाजिक कार्याची उर्मी असलेल्या युवकांना एकत्र करून भक्कम फळी तयार करण्यात आली. याच ग्राम समन्वयकांचे आयोजन, नियोजन आणि संयोजनातून शैक्षणिक साहित्य वाटपाची मोहीम  यशस्वी करण्यात आली.

सोशल नेटवर्किंग फोरमच्या व्यासपीठावरून युवा  ग्राम समन्वयकांनी आपली जबाबदारी उत्तम रितीने बजावत आपल्याच बंधू-भगिनींना ज्ञानार्जनासाठी साहित्य पोहचविले.

फोरमचे प्रमुख गायकवाड यांनी एसएनएफ ग्रामसमन्वयक संकल्पना विषद केली. आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण आणि पाण्याच्या अनेक समस्या असतात. या समस्या वेळेवर फोरमपर्यंत पोहोचल्या तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतात.

यासाठी गाव तिथे ग्रामसमन्वयक ही संकल्पना आम्ही राबवली आहे. आनंदाची बाब म्हणजे या समन्वयांकडून अनेक समस्या आमच्यापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्यापैकी काही सोडवण्यातही फोरम यशस्वी ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्यातील अनेक तरूणांनी या सामाजिक कार्यात स्वयंस्फू र्तीने सहभाग नोंदवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 2:16 am

Web Title: distribution of educational materials to students deprived of online education zws 70
Next Stories
1 योजनेला शेतकऱ्यांचा विरोध कायम
2 हरित क्षेत्र विकास योजनेच्या पुढील प्रक्रियेस मान्यता
3 अपहृत युवकाची स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन तासांत सुटका
Just Now!
X