News Flash

जिल्ह्य़ात पोलीसांची शालेय तपासणी मोहीम

सौरभला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विद्यार्थ्यांच्या हत्येची पोलिसांकडून गंभीर दखल

ओझर येथील एका शाळेत विद्यार्थ्यांची हत्या झाल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्य़ात शाळा तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत पालकांचे प्रबोधनही करण्यात येणार आहे.

ओझर येथील इंग्रजी माध्यमाच्या नववीच्या वर्गात शिकणारा सौरभ पाल व अल्पवयीन मुलगा एकाच वर्गात शिकत होते. सौरभ खेळताना त्याच्या डोक्यात टपली मारून लपून बसायचा, याचा राग त्या मुलाच्या डोक्यात होता. मंगळवारी शाळेच्या आवारात कवायतीचा तास सुरू असताना याच प्रकाराची पुनरावृत्ती घडली. त्यावेळी राग अनावर झाल्याने  त्या मुलाने दप्तरात लपवून आणलेला चाकू सौरभच्या पोटात खुपसला. अन्य विद्यार्थ्यांनी हा प्रकार सांगितल्यावर शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. सौरभला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या घटनेनंतर शाळेच्या आवारात, दप्तरात तीक्ष्ण हत्यारे, अनावश्यक साहित्य कसे आणले जाते, पालक व शाळा प्रशासन नेमके काय करते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळकरी विशेषत अल्पवयीन बालकांचा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमधील सहभाग वाढत असल्याचे या घटनेतून दिसत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शाळांमध्ये दप्तर तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

या मोहिमेत दर महिन्याला पालकांसोबत शाळा प्रशासन व पालकांची बैठक होणार आहे. त्यात मुलांच्या वागण्यातील बदल, त्यांची शैक्षणिक कारकीर्द, वर्तणूक यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पालकांची सध्या एकत्रित बैठक बोलवत त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित विद्यार्थ्यांला उंटवाडी येथील निरीक्षणगृहात बुधवारी सायंकाळी दाखल करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:25 am

Web Title: district police inspection campaign in school
Next Stories
1 उत्कृष्ठ वक्ता होण्यासाठी स्पर्धकांना परीक्षकांचा कानमंत्र
2 बँक कर्मचारी असल्याचे सांगून घातला २५ हजारांचा गंडा
3 पक्षनिष्ठेपेक्षा ‘उमेदवारी’ हाच आमचा पक्ष
Just Now!
X