News Flash

चोरटय़ांची दिवाळी

येवला येथील साई कॉलनी परिसरातील शाम श्रीश्रीमाळ यांचे त्याच परिसरात कपडय़ाचे दुकान आहे.

मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने भर दिवसा घरातून चोरटय़ाने लंपास केल्याची घटना येवला शहरातील बदापूर रस्त्यावर घडली. दिवाळीच्या काळात बंद घरे धुंडाळून चोरटे सक्रिय झाल्याचे या घटनेने दर्शविले आहे.

येवला येथील साई कॉलनी परिसरातील शाम श्रीश्रीमाळ यांचे त्याच परिसरात कपडय़ाचे दुकान आहे. मुलीचे लग्न असल्याने ऐनवेळी धावपळ नको म्हणून त्यांनी लग्नासाठी काही दागिने तयार करत घरात ठेवले. दिवाळीची धामधूम सुरू असल्याने ग्राहकांची कपडे खरेदीसाठी गर्दी असल्याने कुटुंबीय दुकानात मदत करण्यासाठी गेले होते. ही संधी साधत चोरटय़ाने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. शयनकक्षातील कपाट बनावट चावीने उघडले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच काही रोकड असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. कोणाला संशय नको म्हणून घरातून पोबारा करताना चोरटय़ाने मागील दरवाजाचा वापर केला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणा माहीतगाराचे हे काम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 3:59 am

Web Title: diwali of thief
टॅग : Diwali
Next Stories
1 बोलेरो गाडी लंपास
2 नांदगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची भेट
3 लक्ष्मीच्या स्वागतासाठी शहर सज्ज
Just Now!
X