नाशिक : गुन्हे शोधण्यात श्वान पथकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्याची जाणीव ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाने श्वान पथकातील अमली पदार्थशोधक म्हणून ओळख असलेल्या शेरा या जर्मन शेफर्ड श्वानाचा तिसरा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

या वेळी  पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील उपस्थित होते.  शेरा हा पथकातील अत्यंत तरबेज श्वान आहे. ग्रामीण पोलीस दलात एकू ण तीन श्वान कार्यरत आहेत. त्यापैकी जर्मन शेफर्ड शेरा हा अमली पदार्थ शोधण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. डॉबरमॅन टॉमी आणि राणा हे गुन्हाशोधक म्हणून कार्यरत आहेत. शेरा हा एक महिन्याचा असल्यापासून ग्रामीण पोलिसांसोबत काम करत आहे. शेराला राजस्थानातील सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्रात अमली पदार्थ शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून शेरा ग्रामीण पोलिसांसोबत काम करत आहे. मागील वर्षी राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात शेरा यास चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. तसेच नाशिक परिक्षेत्र मेळाव्यात तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

शेराच्या वाढदिवस कार्यक्र मात जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी गुन्हेगार शोधून काढण्यात आणि गुन्ह्य़ाचा तपास करण्यात पुष्कळदा पोलीस दलातील मूक श्वानांचा वाटा असतो, असे सांगितले. त्यांच्या कामगिरीचा यथोचित सत्कार आणि जनमानसात त्यांचे काम माहीत होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी श्वान पथकाचे विनायक राऊत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.