27 September 2020

News Flash

डॉ. विकास व भारती आमटे यांना ‘अक्षय्य पुरस्कार’

संस्थेच्या अमृत महोत्सवपूर्ती समारोपानिमित्त

संस्थेच्या अमृत महोत्सवपूर्ती समारोपानिमित्त
दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूट संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘अक्षय्य पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे व डॉ. भारती आमटे यांना जाहीर झाला आहे.
संस्थेच्या अमृत महोत्सवपूर्ती समारोपानिमित्त ३० एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदापासून संस्थेच्या वतीने राज्यस्तरावर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना अक्षय्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे हे प्रमुख पाहुणे असतील. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन अध्यक्षस्थानी राहणार असून आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे याही उपस्थित राहणार आहेत. १९४० मध्ये स्थापन झालेल्या दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूटने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने २०१५-१६ हे शैक्षणिक वर्ष संस्थेने अमृतपूर्ती महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. या वर्षांत संस्थेने विविध उपक्रम राबविले.
सर्वानी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन, संस्थेचे सरचिटणीस हेमंत बरकले  तसेच अमृतपूर्ती महोत्सवी समितीचे प्रमुख रवींद्र कदम यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 2:26 am

Web Title: dr vikas amte and bharti amte got akshaya awards
टॅग Baba Amte
Next Stories
1 आधार नोंदणी वाऱ्यावर
2 विहीर खोदताना जिलेटिन स्फोटात दोन ठार
3 कुमारी माता होण्याच्या प्रमाणात वाढ
Just Now!
X