29 October 2020

News Flash

त्र्यंबक परिसरात कीटकभक्षी गवती दवबिंदूचा बहर

कळमुस्ते घाटात ही वनस्पती आढळली

कळमुस्ते घाटात ही वनस्पती आढळली

नाशिक  : लाजाळू वाटणाऱ्या, स्वत:चे अन्न स्वत: तयार करणाऱ्या आणि मनुष्यासाठी उपयोगी पडणारा प्राणवायू हवेत सोडणाऱ्या अशा अनेक वनस्पती सर्वाच्या परिचयाच्या आहेत. परंतु, आपल्या अन्नासाठी थेट कीटकांचे भक्षण करणाऱ्या वनस्पतीही जगात आहेत. त्र्यंबक जवळील कळमुस्ते घाटात सध्या ड्रोसेरा इंडिका (गवती दवबिंदू ) ही कीटकभक्षी वनस्पती आढळून येत असल्याची माहिती नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आणि या परिसरातील वनफुलांवर अभ्यास करणारे प्रा. आनंद बोरा यांनी दिली आहे.

ड्रोसेरा इंडिका ही प्रजाती आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिणपूर्व आशिया आणि पूर्वेकडील आशिया, जपानपर्यंत अगदी उत्तर भागातही आढळते.

वर्षभर या वनस्पतीची झाडे असतात. झटकन वाढतात. ही वनस्पती  वालुकामय मातीवर आणि पावसाळ्यात दलदलीच्या ठिकाणी आढळते.

या वनस्पतीच्या तीन  प्रजाती देखील आहेत. ही वनस्पती छोटे कीटक भक्षण करते. याविषयी प्रा. बोरा यांनी अधिक माहिती दिली. ड्रॉसेरा इंडिका ही एक कीटकनाशक वनस्पती आहे.  ड्रोसेरा इंडिका एक तंतुमय मुळे असणारी समर्थित औषधी वनस्पती आहे.

या वनस्पतीतील फुले कीटकांना आकर्षित करतात. फांद्यांवरील चिकट द्रव कीटकांना सापळ्यात अडकू न ठेवतो. अशी अनोखी वनस्पती आढळणाऱ्या त्र्यंबक  परिसरातील जैव विविधतेचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे बोरा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:04 am

Web Title: drosera indica plant found in the trimbak area zws 70
Next Stories
1 ‘सीबीएससी’कडून गुणपत्रिका न मिळाल्याने १० वी, ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपुढे संकट
2 बिबटय़ाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
3 ‘उमेद’च्या शेकडो महिलांचा ४  तास मैदानावर ठिय्या
Just Now!
X