15 December 2017

News Flash

फुगा गिळल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

नाशिकमधील घटना

नाशिक | Updated: August 10, 2017 7:46 PM

नाशिकमध्ये खेळण्यातील फुग्याने चिमुकल्याचा जीव घेतलाय. खेळताना फुगा गिळल्यामुळे आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. शहरातील सिडकोच्या (नवीन नाशिक) हनुमान चौक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वीर विनोद जयस्वाल, असे मृत बालकाचे नाव आहे. सकाळी हवा भरलेल्या फुग्यासोबत हा चिमुकला खेळत होता. फुगा तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असताना अचानक फुगा फुटला. यावेळी फुग्याचा तुकडा चिमुकल्याच्या घशात अडकून श्वास गुदमरुन बाळाचा मृत्यू झाला.

चिमुकल्याने फुगा गिळल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी तात्काळ मुलाला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.

First Published on August 10, 2017 7:45 pm

Web Title: eight month old chiled death in nashik