29 October 2020

News Flash

बिबटय़ाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

वृद्धावर हल्ला करणारी तीच बिबटय़ा मादी आहे काय, हे वन विभागाकडून तपासले जात आहे.

इगतपुरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कुरुंगवाडी येथे सोमवारी पहाटे बिबटय़ाने के लेल्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला. या वृद्धावर घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती खैरगाव येथील वनपाल भाऊसाहेब राव यांनी दिली.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुरुंगवाडी येथे कानू चिमा धुपारे (७५) हे राहतात. रविवारी धुपारे हे झोपडीच्या पडवीत झोपलेले असताना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास अचानक बिबटय़ाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली खैरगाव वनपाल भाऊसाहेब राव, वनरक्षक नरेश नावकर, प्रियंका साबळे, सोमनाथ जाधव, रूपाली गायकवाड, चिंतामण गाडर, एफ. जी. सैयद, मुजावर शेख आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी के ली.

ऑगस्टमध्ये याच भागातील नांदगावसदो येथे एका घरात बिबटय़ा मादीने चार पिल्लांसह १० ते १२ दिवस वास्तव्य के ल्याने दहशत पसरली होती. वृद्धावर हल्ला करणारी तीच बिबटय़ा मादी आहे काय, हे वन विभागाकडून तपासले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:03 am

Web Title: elderly man injured in leopard attack zws 70
Next Stories
1 ‘उमेद’च्या शेकडो महिलांचा ४  तास मैदानावर ठिय्या
2 नाशिकच्या ‘एचएएल’ कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी
3 मराठा-ओबीसी वाद मिटवा
Just Now!
X