28 November 2020

News Flash

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया रखडल्या

सात महिन्यांपासून करोनाचा फटका

दाम्पत्यांसमोर मानसिक, आर्थिक समस्या, सात महिन्यांपासून करोनाचा फटका

चारुशीला कुलकर्णी

नाशिक :  करोनाचा फटका वेगवेगळ्या क्षेत्रांना बसला असताना काही दाम्पत्यांसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. अनैच्छिक बाळंतपण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या कु टुंब कल्याण शस्त्रक्रि या सात महिन्यापासून रखडल्या आहेत. सरकारी दवाखान्यात या शस्त्रक्रि या होत नसताना खासगी रुग्णालयांमध्ये करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांपासून असणारा धोका पाहता शस्त्रक्रि या बंद ठेवण्यात आल्या. काही खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रि या होत असल्या तरी त्यासाठीचा तेथील खर्च पाहता अनेकांनी खासगी रुग्णालयांमध्ये जाणे टाळले आहे.

वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रि यांविषयी प्रसार आणि प्रचार करण्यात आला. या माध्यमातून वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना नको असलेले बाळतंपण सुरक्षितरीत्या टाळण्यात येत असल्याने अनेकांची या पर्यायाला पसंती लाभली. राज्यात नाशिक जिल्हा कुटुंब कल्याण शस्त्रक्रि येत पहिल्या पाचमध्ये राहिला आहे. मागील वर्षी जिल्ह्य़ातील बागलाण, चांदवड, देवळासह १५ तालुक्यांमध्ये २६ हजार ९६८ लक्ष्यांकापैकी पुरुष नसबंदी, महिलांची गर्भपिशवीची तसेच संबंधित इतर अशा नऊ हजार ४९६ शस्त्रक्रि या पार पडल्या.

यंदा मात्र हे चित्र उलट आहे. १५ तालुक्यातील कु ठल्याच तालुक्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रि या झाली नाही. महिलांच्या के वळ ६६८ शस्त्रक्रि या झाल्या असून लेप्रोची एकही शस्त्रक्रि या झाली नाही. परिणामी २६,९६८ लक्ष्यांकापैकी के वळ ६६८ शस्त्रक्रि या पार पडल्या. एकू ण लक्ष्यंकाच्या केवळ दोन टक्के  शस्त्रक्रि या पार पडल्या.

मार्चपासून ठाण मांडलेल्या करोनामुळे टाळेबंदी लागू झाली. सरकारी रुग्णालये ही करोना उपचार केंद्र झाल्याने अन्य रुग्णांना ही बाधा नको म्हणून अन्य शस्त्रक्रि या थांबविण्यात आल्या. दुसरीकडे, खासगी रुग्णालयांनीही कु टुंब कल्याण शस्त्रक्रि या, गर्भपात करणे टाळले. परिणामी या काळात नको असलेल्या गरोदरपणाची संख्या वाढली आहे. पुढील मार्चपर्यंत हे चित्र अधिक स्पष्ट होईल. शस्त्रक्रि या रखडल्याने रुग्णांना आर्थिक, मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

करोनाची भीती मनातून जाणे गरजेचे

मार्चमध्ये करोना आल्यापासून सर्व शस्त्रक्रि या थांबविण्यात आल्या. ज्यांना तातडीने उपचार हवेत अशाच शस्त्रक्रि या या काळात झाल्या. कु टुंब कल्याण शस्त्रक्रि या ऐच्छिक असल्याने या काळात त्या रखडल्या. तसेच करोनाचा संसर्ग पाहता सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन हा धोका का पत्करावा म्हणून अनेकांनी रुग्णालयात येणे टाळले. शिथिलीकरणाच्या प्रक्रि येत या शस्त्रक्रि या सुरू करण्यात आल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच आणि ग्रामीण रुग्णालयात १० शिबिरांच्या माध्यमातून या शस्त्रक्रि या होतील. परंतु, लोकांच्या मनातील  करोनाची भीती दूर होणे गरजेचे आहे. या काळात नको असलेले गरोदरपण वाढण्याची शक्यता आहे. पुढील मार्चपर्यंत हे चित्र अधिक स्पष्ट होईल.

-डॉ. कपिल आहेर  (जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:05 am

Web Title: family planning surgery stalled due to coronvirus zws 70
Next Stories
1 व्यापाऱ्यांच्या वादात नामपूरमध्ये कांदा लिलाव बंद
2 वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा
3 गैरहजर विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा
Just Now!
X