18 January 2018

News Flash

नाशिकमध्ये अंगावर वीज पडून शेतकरी ठार

मका लागवड करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळली

नांदगाव, नाशिक | Updated: June 10, 2017 8:20 PM

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये मक्याची लागवड करताना अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. रामदास पोपट राठोड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. रामदास राठोड आपल्या शेतात त्यांची पत्नी सुरेखा, भाऊ नवनाथ यांच्यासोबत मका लागवड करत होते. त्या दरम्यान पाऊस सुरू झाला. ज्यानंतर शेतातल्या कामाची आवराआवर सुरु करण्यात आली. ज्यावेळी अचानक रामदास राठोड यांच्या अंगावर वीज पडली. त्यात ते जागीच कोसळले. या दरम्यान त्यांचा भाऊ अरूण यांनाही विजेचा चटका लागून तेदेखील या घटनेत जखमी झाले.

रामदास राठोड यांना जागेवर उलटी झाली. त्यांना त्यांच्या भावाने तातडीने नांदगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक रोहन बोरसे यांनी त्यांना तपासले, मात्र तोवर रामदास यांचा प्राण गेला होता. त्यामुळे डॉक्टर रोहन बोरसे यांनी त्यांना मृत घोषित केले. आज संध्याकाळी उशिरा रामदास राठोड यांच्या पार्थिवावर पोही या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच वीज कोसळली त्या ठिकाणचा पंचनामाही करण्यात आला आहे.

First Published on June 10, 2017 8:20 pm

Web Title: farmer death in nandgaon nashik
  1. A
    Arun
    Jun 10, 2017 at 10:40 pm
    शेतकरी संपावर आहेत, शेतीची कामे बंद केलीत अश्या बातम्या विरोधी पक्षनेते देत असताना आता मक्याची लागवड करताना अंगावर वीज पडून दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. म्हणजे हे संपकरी नेते सपशेल खोटं बोलत आहेत हे सिद्ध झालं.
    Reply