News Flash

गिरणाऱ्यात शेतकऱ्याचा खून

सोमवारी रात्री आठच्या सुमारास शेतातील काम आटोपून बेंडकोळी हे घरी निघाले होते.

नाशिक : शहराजवळील गिरणारे लगतच्या धोंडेगाव येथे शेतकऱ्याचा खून करण्यात आला. पत्ता न सांगितल्यावरून खुनाचा संशय आहे. परंतु कुटुंबीयांनी अद्याप तसा कोणताही संशय व्यक्त केला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मोतीराम बेंडकोळी (धोंडेगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

सोमवारी रात्री आठच्या सुमारास शेतातील काम आटोपून बेंडकोळी हे घरी निघाले होते. याच वेळी रस्त्यावर मोटारीतील अनोळखी व्यक्तींनी पत्ता विचारल्याचे सांगितले जाते. पत्ता न सांगितल्याने संशयितांनी त्यांच्याशी वाद घातला. या वादातून मोटारीतील व्यक्तींनी शेतकऱ्यावर शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले जाते. यात बेंडकोळी यांचा मृत्यू झाला.

या संदर्भात हरसुल पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी पत्ता न सांगितल्यावरून वाद झाल्याचा संशय असल्याचे सांगितले. परंतु कुटुंबीयांनी अद्याप तसा संशय व्यक्त केलेला नाही. याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:23 am

Web Title: farmer murder near nashik city zws 70
Next Stories
1 तामिळनाडू येथून नाशिकचे १९ विद्यार्थी घरी परतले
2 मजुरांच्या वाहतुकीत नियोजनाचा अभाव ; मेधा पाटकर यांची तक्रार
3 निवारागृहे शांत शांत..!
Just Now!
X