नाशिक : प्रस्तावित नाशिक-पुणे जलदगती रेल्वे मार्गाला नानेगाव, संसरीसह बेलतगव्हाणचे ग्रामस्थ विरोध करणार असल्याने रेल्वेच्यावतीने मोजणीसाठी कोणी आले नाही. ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलन के ले.

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी संपादित करावयाच्या जागेच्या मोजणीसाठी रेल्वेचे कर्मचारी नानेगावला येणार होते. परंतु, अलिकडेच ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव देत या रेल्वे मार्गास विरोध असल्याचे जिल्हा प्रशासनासह, रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे कळविले होते. मोजणी होईल म्हणून संसरी, बेलतगव्हाण, शेवगेदारणा येथील ग्रामस्थ नानेगाव येथे जमले. सकाळपासूनच नानेगावला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. नानेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.