24 January 2020

News Flash

कांदा उत्पादकांचे पैसे देण्यास व्यापाऱ्याकडून टाळाटाळ

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा प्रयत्न

सटाणा पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दस्तऐवज करूनही व्यापाऱ्याने दोन महिने उलटूनही ४२५ कांदा उत्पादकांचे पैसे न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सटाणा बाजार समितीबाहेर सटाणा-मालेगाव रस्त्यावर वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तो हाणून पाडला.

सटाणा बाजार समितीमध्ये विक्रीस आलेला कांदा गजानन ट्रेडिंग कंपनीने तालुक्यातील ४२५  शेतकऱ्यांकडून खरेदी केला होता. त्या मोबदल्यात धनादेश देण्यात आला. परंतु हे धनादेश न वटल्याने उत्पादकांनी संबधित व्यापाऱ्याकडे तगादा लावला होता. वेळोवेळी तारीख देऊनही पैसे न मिळाल्याने दोन महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी बळाचा वापर करून हा प्रयत्न हाणून पाडला. नंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे मोर्चा वळवला.

गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. कष्टाचे पैसे मिळविण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आंदोलनात रवींद्र अहिरे, रवींद्र पवार, कारभारी धोंडगे, दौलत अहिरे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

आश्वासनानंतरही व्यापाऱ्यांचे हात वर

सटाणा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन महिन्यात शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील, असे  पोलीस प्रशासन आणि बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्याकडून लिहून घेतले होते. लेखी आश्वासनानंतरही व्यापाऱ्याने हात वर केल्याने संतप्त झालेल्या शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी बाजार समितीबाहेर गोंधळ घालून आंदोलनाचा प्रयन्त केला.

First Published on August 13, 2019 1:34 am

Web Title: farmers are in a very bad condition in maharashtra mpg 94
Next Stories
1 महापुरात व्यापाऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान
2 जोपर्यंत पाऊस, तोपर्यंत विसर्ग
3 महसूल कर्मचाऱ्यांचे जादा काम आंदोलन आंदोलन
Just Now!
X