10 April 2020

News Flash

कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी रास्ता रोको

दोन महिन्यांपूर्वी १० हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडणारा कांदा आता दीड हजार रुपयांवर आला आहे.

देवळा येथे रास्ता रोको करताना शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी. (छाया- महेश सोनकुळे)

देवळा येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

देवळा : देशांतर्गत बाजारात प्रचंड आवक होऊन कांद्याचे दर कमालीचे घसरत असल्याने निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी, प्रहार शेतकरी संघटना यांच्यावतीने विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

दोन महिन्यांपूर्वी १० हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडणारा कांदा आता दीड हजार रुपयांवर आला आहे. देशांतर्गत बाजारात कांद्याचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातली. स्थानिक बाजारात कांद्याची आवक वाढल्यानंतरही निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला गेलेला नाही. निर्यातबंदी हटविल्यास देशांतर्गत बाजारात भाव स्थिर होण्यास हातभार लागणार आहे.

केंद्र सरकारने नुकताच आंध्र प्रदेशातील केपी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वाधिक कांद्याचे राज्यात उत्पादन होते. एका राज्यातील कांद्यास परवानगी आणि दुसऱ्या राज्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याची भावना आंदोलकांनी बोलून दाखविली. देवळा परिसरातील पाचकंदील भागात शेतकरी रस्त्यावर उतरले. पुढील काळात ५० लाख मेट्रिक टन कांदा विक्रीला येणार आहे. निर्यातीवरील बंदी न हटविल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील.

सध्या मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्च भरून निघत नाही. कांदा भावातील घसरण रोखण्यासाठी निर्यातीला चालना देण्याचे धोरण स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधितांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, कृष्णा जाधव, कुबेर जाधव, कुणाल शिरसाट आदींनी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ आणि पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 1:19 am

Web Title: farmers participate in rasta roko to lift the onion export ban zws 70
Next Stories
1 शिक्षकाच्या प्रयत्नांमुळे मृत विद्यार्थिनीच्या पालकांना घर
2 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय का? नाशिकमध्ये मोदी सरकारविरोधात रास्ता रोको
3 वीज दरवाढ झाल्यास मंदी, बेरोजगारीत वाढ
Just Now!
X