05 April 2020

News Flash

सिडकोतील खून प्रकरणी पाच संशयितांना पोलीस कोठडी

हल्ल्यात जखमी झालेल्या तात्या दांडेकरची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पूर्ववैमनस्यातून दोन गटांतील धुमश्चक्रीत एकाची हत्या तर दुसरा गंभीर झाल्याच्या प्रकरणात जेरबंद केलेल्या पाच संशयितांची शुक्रवारी न्यायालयाने १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील दोन संशयित अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेत मयत झालेल्या अशोक दांडेकरवर तणावपूर्व वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सिडको परिसरातील इंदिरा गांधी वसाहतीत अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणावरून काळे-दांडेकर आणि गायकवाड यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यावरून संबंधितांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईदेखील झाली होती. त्याचा राग गायकवाड कुटुंबीयांच्या मनात होता. गुरुवारी अशोक दांडेकर व तात्या दांडेकर हे स्टेट बँक चौकातील महाराणी वाइन शॉप येथे दारू घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी दांडेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. त्यात अशोक हे जागीच ठार झाले तर तात्या गंभीर जखमी झाले. याची माहिती समजल्यानंतर दांडेकर कुटुंबीय व नातेवाईकांनी उपरोक्त परिसरात धुडगूस घातला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत संशयित विनायक गायकवाड, अशोक काळे, मोहन काळे, ठकूबाई काळे, सुंदर गायकवाड यांना अटक केली. अन्य अनिल काळे व पप्पू काळे हे दोघे फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शुक्रवारी अटकेत असणाऱ्या पाच संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, हल्ल्यात मयत झालेल्या अशोक दांडेकरच्या पार्थिवावर तणावग्रस्त वातावरणात अन्त्यसंस्कार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तात्या दांडेकरची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2016 3:12 am

Web Title: five suspects arrested for sidako murder case in nashik
टॅग Nashik
Next Stories
1 अनाकलनीय सूचनांमुळे ‘आयआयटी’ पूर्वपरीक्षार्थी संभ्रमित
2 ‘शिवरायांची युद्धनीती विसरल्याने देश असुरक्षित’
3 सप्तशृंग गडावर २६ कुंडांची दुरुस्ती
Just Now!
X