जिल्ह्य़ात गडकोट संवर्धनाचे काम करणाऱ्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने नाशिककरांना जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती व्हावी, त्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत दिपालीनगर येथील साधना कलादालनात ‘किल्ला’ छायाचित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

प्रदर्शनात जिल्ह्यातील शिवकालीन २५ किल्ल्यांची छायाचित्रे राहणार आहेत. त्यात साल्हेर, मुल्हेर, हस्तगड, वाघेरा, देहरी, रांजणगिरी, विश्रामगड, हरिहर, श्रीगड, रामशेज, भास्करगड आदी किल्ल्यांचा समावेश आहे. प्रदर्शनात किल्ल्यांची माहिती दिली जाणार असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते गड-किल्ल्यांवर काम करणाऱ्या आणि नाशिकमधील ज्येष्ठ ट्रेकर्सचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गड-किल्ल्यांची माहिती व्हावी, यासाठी संकेत नेवेकर यांचा ‘जेव्हा गडकोट बोलू लागतात..’ हा एकपात्री प्रयोग होणार आहे.  विद्यार्थी, पालक व इतिहासप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.