News Flash

मालेगावच्या वादग्रस्त रुग्णालयांविरुद्ध गुन्हा

सिक्स सिग्मा आणि सनराइज हॉस्पिटलमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रोरी होत्या.

(संग्रहित छायाचित्र)

महापालिके ची फसवणूक

नाशिक : रुग्णांची लूट होत असल्याने कृषिमंत्री दादा भुसे यांनी थेट रुग्णालयात जाऊन जाब विचारल्याने चर्चेत आलेली मालेगाव येथील सिक्स सिग्मा आणि सनराइज ही दोन रुग्णालये आता फसवणुकीच्या चक्रोतही अडकली आहेत. मालेगाव महापालिके ची आर्थिक फसवणूक के ल्याप्रकरणी रुग्णालयाच्या संचालकांवर मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिक्स सिग्मा आणि सनराइज हॉस्पिटलमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रोरी होत्या. रुग्णालय संचालक रमणलाल सुराणा यांनी मालेगाव महापालिके कडे दोन्ही रुग्णालयाच्या नोंदणी के ल्या होत्या. त्या संदर्भात दाखला मिळावा यासाठी महापालिके च्या आरोग्य अधिकारी यांच्याकडे अर्ज के ला होता. तसेच अर्जासोबत अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखलाही जोडला होता. परंतु मुख्य अग्निशमन विभाग अधिकारी यांच्याकडून सिक्स सिग्मा आणि सनराइज रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नसल्याचे उघड झाले. रुग्णालय संचालकांनी ना-हरकत दाखल्यासमोरील पानावर काहीतरी गडबड करून मूळ दाखल्यावर सिक्स सिग्मा रुग्णालय असे नाव टाकत बनावट ना-हरकत दाखला तयार करत मालेगाव महापालिके ची फसवणूक के ली.

दोन्ही रुग्णालयांच्या इमारतीच्या मालमत्ता कर आकारणीबाबत मिळकत मालकाशी के लेला भाडे करारनामा रुग्णालय संचालकांनी महापालिका प्रभाग क्र मांक एकच्या अधिकाऱ्यांकडे सादर के ला आहे. त्यामध्ये परवाना शुल्क एक लाख, ११ हजार रुपये दाखविण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडे दाखल तसेच प्रभाग अधिकारी यांच्याकडे दाखविलेल्या परवाना शुल्कात तफावत आढळली आहे. संचाकांनी मालेगाव महापालिके ची कर बुडविण्यासाठी चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली. या प्रकारात मालेगाव महापालिके ची दोन लाख, ३० हजार २५६ रुपयांची फसवणूक के ली. याविरुद्ध मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र  महानगरपालिका अधिनियम अंतर्गत संचालक सुराणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:18 am

Web Title: fraud case against six sigma and sunrise hospital in malegaon zws 70
Next Stories
1 बालकाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी
2 शालेय शुल्कवाढ नियंत्रणासाठी विभागीय समिती
3 अनुकंपा तत्वावर १४७ उमेदवारांची महापालिकेत नेमणूक
Just Now!
X