नायजेरियन नागरिकासह एकाला अटक

नाशिक : औषधाचे उत्पादन तयार करण्याचे आमिष दाखवत येथील एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना नाशिक शहर सायबर शाखेच्या पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. त्यात एक नायजेरियन आहे. त्यांच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

येथील एका व्यक्तीने भ्रमणध्वनीत टुली मॅडली हे अ‍ॅप डाऊनलोड के ले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्याची मोनिका सिंग या महिलेशी ओळख झाली. मोनिका नेदरलँड येथे राहत असून तेथील बोरटॅड फार्मास्युटिकल नावाच्या कंपनीत साहाय्यक पदावर काम करत आहे. या कं पनीच्या वतीने संसर्गजन्य आजारांवर उपयुक्त असलेले तेल तयार करण्यात येते. या तेलासाठी आवश्यक असलेले ओगरिनम हर्बल ऑइल हा कच्चा माल गरजेचा आहे. कंपनी हा माल इंडोनिशिया येथून आयात करते. परंतु सध्या हे तेल दक्षिण भारतात राजेश नंदी यांच्याकडे मिळत आहे. या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाची चांगली संधी मिळू शकते, असे चित्र मोनिकाने रंगविले. त्यानुसार तक्रारदाराने नंदी यांच्याकडून सहा लिटर तेल कु रिअरद्वारे मागविले. हे तेल बंगळूरु येथे जाऊन बोरटॅडचा प्रतिनिधी असलेल्या बर्नाड फाबियान याला नमुना म्हणून दिले. तेल योग्य असल्याचे भासवत फिर्यादीकडे २०० लिटर तेलाची नोंदणी करत वेगवेगळ्या बँके च्या खात्यात फिर्यादीला पैसे भरण्यास सांगितले. वेळोवेळी झालेल्या व्यवहारात सिंग हिच्या खात्यावर १९ लाख ६०० रुपये जमा झाले. परंतु नंदी याच्याकडून तेल आले नाही. तसेच सिंग हिच्याकडूनही पैसे आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधिताने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. नाशिक शहर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक विश्लेषण करत एक पथक नवी दिल्ली येथे पाठविले. तेथील सायबर पोलिसांशी संपर्क साधत नायजेरियन व्हिक्टर डॉमिनिक ओके न (४२, रा. नवी दिल्ली), पवन कु मार हरके श बैरवा (२४, रा. पश्चिाम दिल्ली) यांना ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी मोनिका सिंग नावाची व्यक्ती बनावट असल्याचे उघड झाले. संशयितांनी पोलिसांशी झटापट करण्याचा प्रयत्न के ला. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी शरणागती पत्करली.