नाशिक : करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने बाजारपेठ परिसरात पाच रुपये शुल्क घेण्याचा निर्णय स्थगित करून मोफत कु पन देणे सुरू के ले आहे. प्रशासनाकडून नव्याने व्यवस्था करण्यात आली असतांनाही नागरीकांकडून कु पन न घेताच बाजारपेठ परिसरात थेट प्रवेश करण्यात येत असल्याने बाजारपेठेतील गर्दी कायम राहिल्याचे गुरूवारी दिसून आले. या व्यवस्थेमुळे पोलिसांवरील ताण मात्र वाढला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास बाजारपेठेतील गर्दी सहाय्यभूत ठरत असल्याचे लक्षात आल्याने पोलीस तसेच महापालिके च्या वतीने संयुक्त कारवाई अंतर्गत बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी पाच रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. शुल्काची पावती घेण्यासाठी होणारी गर्दी तसेच सामाजिक अंतर नियमाचा नागरिकांना पडणारा विसर यामुळे कारवाईच्या मूळ हेतूलाच छेद दिला जात असल्याने शुल्क वसुलीचा निर्णय स्थगित करण्यात आला.

बुधवारी रात्री उशिराने या संदर्भात पत्रकाव्दारे जाहीर करण्यात आले. पर्याय म्हणून गुरुवारी सकाळपासून बाजारपेठेकडे जाणाऱ्यांना बादशाह कॉर्नर, धुमाळ पॉईंट, नेपाळी कॉर्नर येथे पोलिसांकडून मोफत कु पन देण्यास सुरुवात झाली. या कु पनवर वेळ नोंदविण्यात येवून एक तासापेक्षा अधिक काळ रेंगाळल्यास दंड आकारण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु, या निर्णयाची माहिती नसल्याने किं वा नागरीकांमधील बेफिकीर वृत्ती कायम राहिल्याने गुरूवारी बाजारपेठेत गर्दी होती.

नागरीक पोलिसांकडून कु पन न घेता थेट पुढे जात होते. गर्दीवर नियंत्रण आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी कु पन देणे, गर्दी रोखणे अशी जादा कामे पोलिसांना करावी लागत असल्याने त्यांचे काम वाढले आहे. या काळात  पोलिसांना गस्तीचा विसर पडला.

नागरीक घुसखोरी करत असतांना कोठेही त्यांना अटकाव झाला नाही, कु पन घेण्याविषयी विचारणा झाली नाही. किती जणांवर कारवाई झाली, ही आकडेवारीही सांगितली गेली नाही.

गर्दीवर नियंत्रण मिळावे म्हणून बाजारपेठेत शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु, महापालिके कडे मनुष्यबळ कमी असल्याने शुल्क वसुलीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. किती जणांवर कारवाई झाली हे सायंकाळी उशीराने समजेल. या उपक्र माचा रुग्ण संख्या वाढीवर काय परिणाम झाला, हे लवकरच कळेल. परिणाम सकारात्मक असतील तर शहर परिसरातील अन्य बाजारपेठेतही सशुल्क प्रवेश सुरू करण्यात येईल. यामुळे टाळेबंदी टळेल असा विश्वास वाटतो.

– दीपक पाण्डेय (पोलीस आयुक्त, नाशिक)