News Flash

गरजू  रुग्णांना डायलिसीसची मोफत सुविधा

धर्मादाय आयुक्तांच्या संकल्पनेनुसार गरजू रुग्णांना डायलिसीसची सुविधा मोफत देण्यात येणार

प्रतिनिधिक छायाचित्र

धर्मादाय आयुक्तांचा पुढाकार

नाशिक : धर्मादाय आयुक्तांच्या संकल्पनेनुसार गरजू रुग्णांना डायलिसीसची सुविधा मोफत देण्यात येणार असून यासाठी धर्मादाय आयुक्तालयाने शहर परिसरातील सामाजिक संस्था, धार्मिक देवस्थान यांच्या मदतीने पुढाकार घेतला आहे.

ग्रामीण भागात डायलिसीस केंद्र नसल्याने गरीब रुग्णांना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी पदरमोड करत त्रास सहन करत  प्रवास करून जावे लागते. गरीब, गरजू रुग्णांना आर्थिक भुर्दंड, तर होतोच पण मानसिक त्रासही सहन करावा लागतो. गरीब रुग्णांची परवड थांबविण्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाने मोफत डायलिसीस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत नाशिक, सिन्नर, सटाणा, येथील धार्मिक संस्था, सेवाभावी संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते.

गरीब आणि दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मोफत डायलिसीसची सुविधा देण्यासाठी सटाणा, सिन्नर, सुरगाणा, पेठ अशा दुर्गम, तसेच आदिवासीबहुल परिसराची निवड  करण्यात यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली.

पुढील काळात जमा होणाऱ्या निधीवर ही भिस्त असल्याचे धर्मदाय आयुक्तालयाचे निरीक्षक किशोर तळोकर यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा करत ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लोकसहभागातून असे केंद्र सुरू करता येईल काय, यावर चर्चा करण्यात येईल. तसेच, शहरातील काही मोठय़ा रुग्णालयांनी आपल्याकडील साधनसामग्री अशा सामाजिक उपक्रमांसाठी खुली करावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्तालयाकडून करण्यात येणार असल्याचे तळोकर यांनी सांगितले. लवकरच या संदर्भात अंतिम बैठक घेण्यात येणार असून त्या बैठकीत पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 3:41 am

Web Title: free dialysis facility for needy patients
Next Stories
1 आयुक्तांची पाठराखण की स्वपक्षीयांना संरक्षण?
2 दीडशे एकरातील पेरणीवर नांगर
3 ऑनलाइन फसवणुकीतील पैसे कंपनीला परत
Just Now!
X