News Flash

‘उन्नती’च्या विद्यार्थिनींकडून पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती

विद्यार्थिनींनी त्यापासून राख्या तयार केल्या.

नाशिकच्या उन्नती शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या

मेळघाटचा सन्मान करा, राखी स्वत: तयार करा, सृष्टीबंध राखी वापरा, प्रकृतीचे रक्षण करा असा संदेश देत येथील उन्नती प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी बांबूच्या आकर्षक राख्या तयार करून आपली कल्पकता दाखवत मेळघाटच्या आदिवासी बांधवांना आर्थिक हातभार लावून सामाजिकता जपली.

अमरावतीच्या धारणी तालुक्यातील मेळघाटच्या आदिवासींना मदत म्हणून सामाजिक कार्यकर्ते बापू बागड यांनी बांबूपासून आकर्षक राख्या तयार करण्याचे साहित्य विकत घेऊन उन्नती शाळेतील चिमुकल्यांना दिले. विद्यार्थिनींनी त्यापासून राख्या तयार केल्या. बागड यांनी साहित्य विकत घेऊन आदिवासी बांधवांना मदत करतानाच उन्नती शाळेतील मुलांना त्यांच्यातील कौशल्यास वाव दिला. त्यासाठी शालेय समिती अध्यक्ष सुभाष मुसळे, मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी कौतुक केले. अश्विनी अहिरे, नीलम पाटील, कल्पना विसपुते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 2:47 am

Web Title: from the students of unnati production of eco efficient rakhi
Next Stories
1 मानसिकता बदलल्यास अपघातांचे प्रमाण कमी होणे शक्य
2 खाऊच्या पैशातून राख्यांची निर्मिती
3 ‘पवित्र’मुळे शिक्षक भरतीत पारदर्शकता येण्याची आशा
Just Now!
X