प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वैद्यकीय शाखेचा उपक्रम

नाशिक : समाजमाध्यमात रममाण होणाऱ्या समवयस्क तरुणाईला सामाजिक कार्याकडे वळविण्याच्या उद्देशाने येथील प्रवरा मेडिकल टस्टच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पुढाकार घेतला.

टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन स्पर्धा घेत या माध्यमातून जमा झालेला पैसा येथील देहविक्र य करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या दिशा सामाजिक संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. या माध्यमातून जमा झालेल्या निधीचा वापर  देहविक्र य करणाऱ्या महिलांच्या पुनवर्सनासाठी करण्यात येणार असून या महिलांना कागदी पिशव्या तयार करणे आणि आभूषणे करण्यास शिकविण्यात येणार आहे.

समाज माध्यमात दिवसातील बहुतांश वेळ  युवावर्गाकडून घालविला जातो. या वर्गाला सामाजिकतेचे भान नसल्याची ओरड नित्याची आहे. परंतु, प्रवरा मेडिकल टस्टचे काही विद्यार्थी याला अपवाद ठरले. करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे लागु झालेल्या टाळेबंदीच्या काळात महाविद्यालय बंद झाल्याने प्रवराचे विद्यार्थी आपआपल्या घरी परतले. यातील काही विद्यार्थी महाराष्टासह दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिसा, बिहार आदी ठिकाणी राहत आहेत.

टाळेबंदी लागू होण्यापूर्वी यातील विद्यार्थ्यांचा एक संघ प्रवरा मेडिकल टस्ट संचालित देहविक्र य करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी जोडला गेला. टाळेबंदीमुळे मिळालेल्या हक्काच्या सुट्टीचा वापर करण्यासाठी या संघाने पुढाकार घेतला. दिल्लीची अक्षरा सेहगल, शौर्यकु मार सिंग, आदिल्या क्रोशर, आदिती मुकू ल आदी १२ मित्र-मैत्रिणी ऑनलाईन एकत्र आले. देहविक्र य करणाऱ्या महिलांसाठी काय करता येईल या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांनी युवकांची समाज माध्यमााची आवड लक्षात घेता जुलै, ऑगस्टमध्ये ऑनलाईन स्पर्धा घेतली.  कॉल ऑफ डय़ुटी आणि पब्जीच्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात आली.

भारताच्या कानाकोपऱ्यातून मुला मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यासाठी स्पर्धकांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात आले. स्पर्धा उत्साहात पार पडली. या माध्यमातून १० हजारपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे अक्षराने सांगितले.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या १० हजाराच्या निधीतून या महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करण्यात येणार आहे. महिलांना आकर्षक कागदी वस्तू आणि आभूषणे तयार करण्यास शिकविण्यात येणार आहे. लवकरच या वर्गाला सुरुवात होणार असून नवरात्रात ही उत्पादने ग्राहकांच्या भेटीला येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दिशासंस्थेकडे मदत सुपूर्द

स्पर्धेच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही येथील  प्रवरा मेडिकल टस्टच्या सहकार्याने सुरू झालेल्या दिशा या सामाजिक संघटनेकडे देण्यात आली. टाळेबंदीमुळे देहविक्र य करणाऱ्या महिलांना कु ठलाच रोजगार उपलब्ध नाही. पुन्हा व्यवसाय कधी सुरू होईल, याविषयी शाश्वती नाही. आर्थिक दृष्टचक्र  भेदण्यासाठी काही महिला पुन्हा व्यवसाय करण्याच्या तयारीत असताना या महिलांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी दिशा प्रयत्न करत आहे