News Flash

जलप्रदूषण रोखण्यासाठी ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रम

नाशिकरांचा चांगला प्रतिसाद

प्रातिनिधीक छायाचित्र

नाशिकमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांपासून तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्ती विसर्जनानंतर गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते. हे प्रदुषण रोखण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गेल्या सहावर्षांपासून ‘देव द्या, देवपण घ्या’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्यात आली. यावेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. नाशिककरांनी देखील या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. जनजागृतीनंतर दीड दिवसांचा, पाच दिवसांचा, सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नाशिककरांनी स्वतःहून संपर्क साधून मूर्ती दान करण्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमांतर्गत नाशिककरांच्या घरी जाऊन देखील मूर्ती स्वीकारण्यात येतात.

दरवर्षी नाशिकमधील चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वारा-जवळ गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र तयार करण्यात येते. यंदा विसर्जनाच्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून सुमारे २०० कार्यकर्ते गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन नाशिककरांना करताना दिसतील. यंदाही मंगळवार ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रम राबविला जाणार आहे. गोदावरी नदीला प्रदुषणापासून वाचवण्यासाठी नाशिककरांनी या उपक्रमाला आपली साथ द्यावी, असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या विविध मंडळाच्या व घरगुती गणेशोत्सवातील मूर्तीही संकलित करण्यात येतात. त्यानंतर या सर्व मूर्ती नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2017 2:03 pm

Web Title: ganesh visrjan godavari prevent water pollution in nashik
Next Stories
1 भाजप लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार
2 जळगावमध्ये तडीपार माजी नगरसेवकासह तिघांना अटक
3 ‘दत्तक’ नाशिक महापालिकेत भाजपमध्ये सुंदोपसुंदी
Just Now!
X