News Flash

गॅस टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत

मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे या महामार्गाना शहरात छेदणाऱ्या द्वारका चौफु लीवर गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कं पनीचा गॅस टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

१० तासांच्या अथक प्रयत्नानंतर टँकर बाजूला करण्यात यश

नाशिक : मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे या महामार्गाना शहरात छेदणाऱ्या द्वारका चौफु लीवर गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कं पनीचा गॅस टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे १० तासांच्या अथक प्रयत्नानंतर टँकर बाजूला करण्यात आल्यावर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

सिन्नरकडे निघालेला गॅस टँकर पहाटे व्दारका चौकात आल्यावर वळवितांना वेगावरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. यावेळी टँकरमध्ये १७ टन गॅस होता. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातून एक बंब, महापालिके चे अग्निशमन अधिकारी, कर्मचारी, भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  गॅस गळती होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रस्ते अचानक बंद झाल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी फोडण्यासाठी काठे गल्ली, ट्रॅक्टर हाऊसच्या बाजूने वाहतूक वळविण्यात आली. अग्निशमन विभाग तसेच पोलिसांकडून क्र ेनच्या मदतीने टँकर उभा करण्याचे काम दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. या कालावधीत महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने पुढील दिशेने वळविण्यात आली. टँकर उभा करताच गॅस गळती होत नसल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

व्दारका चौकात उलटलेला गॅस टँकर उभा करण्यासाठी क्र ेनच्या साहाय्याने सुरू असलेले प्रयत्न (छाया-यतीश भानू)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:33 am

Web Title: gas tanker overturns disrupts traffic ssh 93
Next Stories
1 नाशिकच्या आदेश यादव, यमुना लडकतला सुवर्ण पदक
2 समता परिषदेच्या आंदोलनात करोना नियम पायदळी
3 विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा शुल्कात सवलत द्यावी
Just Now!
X