नाशिकरोड रेल्वे व बस स्थानक परिसरात बॅगमध्ये २५ जिलेटीन कांडय़ा आणि ११ डिटोनेटर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी सकाळी सराफ व्यावसायिकांचा रेलरोको आंदोलन असल्याने स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणावर गर्दी होती. अकराच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात बेवारस बॅग असल्याचा दूरध्वनी केला.या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी रेल्वे स्थानक गाठले असता संशयास्पद बॅग बेवारस स्थितीत आढळून आली. ही माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक के. व्ही. वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. बॅगची तपासणी केली असता त्यात २५ जिलेटीन सदृश कांडय़ा व ११ डिटोनेटर आढळून आले. नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे हे जिलेटीन व डिटोनेटर आहेत. कारवाईत जप्त केलेले स्फोटक पदार्थ नाशिकरोड पोलीस ठाण्यात जमा करत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
students clashed again in pune university premises
पुन्हा विद्यार्थी भिडले! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुन्हा हाणामारी….