News Flash

१,२०० रुपयांत रेमडेसिविर मिळणार

गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांना महागड्या दरात औषधांची खरेदी करावी लागत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी झाल्या होत्या.

(अन्न, औषध प्रशासनाच्या सूचनेनंतर शहरातील १७ खासगी रुग्णालयांतील औषध दुकानात असे फलक लावण्यात आले आहेत.

 

खासगी रुग्णालयांमध्ये औषध खरेदी सक्तीपासून सुटका

नाशिक : करोनाबाधितांवरील उपचारात महागड्या दरात रेमडेसिविर खरेदी करावे लागू नये म्हणून अन्न, औषध प्रशासनाने मांडलेल्या संकल्पनेला सहा औषध विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संबंधितांकडून रेमडेसिविर प्रति कुपी १२०० रुपयांत मिळणार आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयांना स्वत:च्या आवारातील दुकानातून औषधे खरेदीची सक्ती करता येणार नाही. १७ रुग्णालयांनी त्यास संमती दर्शवत रुग्ण वा नातेवाईक कुठल्याही विक्रेत्याकडून ती खरेदी करू शकतात असे फलक लावले आहेत.

गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांना महागड्या दरात औषधांची खरेदी करावी लागत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी झाल्या होत्या. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा अन्न,औषध प्रशासनाने निश्चित दरात ते मिळतील याची व्यवस्था केली होती. शासनाने निश्चित केलेल्या दरात ते मिळतील यासाठी काही रुग्णालयात व्यवस्था केली होती. त्यावेळी एक कुपी २३०० रुपयांना मिळत होती.

जिल्हा शासकीय रुग्णालयास व्यवस्थापन करता तारेवरची कसरत करावी लागली होती. परंतु, मधल्या काळात रुग्ण कमी झाल्यानंतर शासकीय निश्चित दराचे बंधन राहिले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकूण रुग्णांपैकी २५ ते ३० टक्के रुग्ण हे शासकीय वा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील काही रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. गतवेळची व्यवस्था कार्यान्वित नसल्याने अन्न औषध प्रशासनाने रुग्णांना कमीत कमी  दरात ती उपलब्ध होईल यासाठी संकल्पना मांडली. वितरकांना अव्याहतपणे रेमडेसिविर मिळेल याची व्यवस्था केली.

सोमवारी दुपारी औषध वितरकांनी अन्न, औषध प्रशासनच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची भेट घेतली. या बैठकीत रेमडेसिविर १२०० रुपयांपेक्षा अधिक दराने किरकोळ विक्री करणार नसल्यावर एकमत झाले. ज्यांना रेमडेसिविर हवे असतील त्यांना रुग्ण सकारात्मक असल्याचा अहवाल, डॉक्टरांची चिठ्ठी, रुग्णाचे आधार कार्ड सादर करावे लागेल. रेमडेसिविर १२०० रुपये दराने गितांजली डिस्ट्रीब्युटर (९८९०२ ९४२९४), सिध्दविनायक फार्मा (८७९६९८९८९८), चौधरी आणि कंपनी (९८२२४  ७८४६२), पिंक फार्मसी (७९७७९ ०२७६२/२३१४४४०), अशोका मेडिकल (८६९८२ ६२९०९) सन मेडिकल (८८८८८२९६६५) या ठिकाणी मिळणार आहेत.

कुठूनही औषधे खरेदी करा

ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहे, तेथील दुकानातून औषध घ्यावेत, असा आग्रह धरता येणार नाही. रुग्ण वा नातेवाईक कुठूनही औषधे घेऊ शकतात. या संदर्भात अन्न. औषध प्रशासनाने केलेल्या सूचनेला शहरातील १७ रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  या रुग्णालयातील दुकानात दर्शनी भागात  ‘रुग्ण/ त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधे घेऊ शकतात’ असे फलक लावण्यात आले आहेत. औषधोपचारावर मोठा खर्च होतो. कुठे स्वस्तात ती मिळणार असतील तर नातेवाईकांना खरेदी करता येतील. उपरोक्त फलक अशोका मेडिकल, पायोनिअर मेडिकल, अपोलो, मॅग्नम, सह्यााद्री, श्री सिध्द विनायक, सुदर्शन आदी रुग्णालयातील औषधी दुकानांच्या दर्शनी भागात लावण्यात आल्याचे अन्न औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 12:35 am

Web Title: get rid of the compulsion to buy medicine in private hospitals akp 94
Next Stories
1 बिबट्याच्या हल्लयात युवक जखमी
2 सधन भागात करोनाचा आलेख वाढताच
3 बंद मंदिराबाहेरूनच भाविकांचा ‘बम बम भोले’चा गजर
Just Now!
X