News Flash

नाशिक: उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची ‘गुड मॉर्निंग’ पथकाकडून फजित

अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रोगराई

गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात

नाशिक जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत’ अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय झाले आहे. या पथकाने नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या पथकाने उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांजवळील टमरेल जप्त करत त्यांची फजिती केली.

‘गुड मॉर्निंग’ पथक सकाळीच मल्हारवाडी परिसरातील डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले. त्यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. हगणदारी मुक्त योजनेची माहिती देऊन जागृती केली. घरात शौचालये बांधा, असे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व पटवून देताना उघड्यावर शौचास बसल्यास अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रोगराई पसरते, असे त्यांना सांगितले. जनजागृतीनंतरही शौचालय न बांधणाऱ्या ग्रामस्थांना कलम ११५ व ११७ नुसार १२०० रुपये दंड किंवा ६ महिन्यांची शिक्षा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक रवींद्र पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 5:27 pm

Web Title: good morning squad action agains open toilet in nashik
Next Stories
1 नाशिक-नगर-मराठवाडा संघर्षांला यंदा विराम
2 आता ऑनलाइन तक्रार करा
3 ‘सावाना’ मेळाव्यासाठी राजकारण्यांना निमंत्रण
Just Now!
X