26 February 2021

News Flash

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ३ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर

फेब्रुवारीत राज्यपाल सुरगाणा तालुक्यातील बोरमाळ येथे भेट देणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फे ब्रुवारी महिन्यात सुरगाणा तालुक्यातील बोरमाळ तसेच सटाणा येथे भेट देणार असल्याने दौऱ्याआधी दोन्ही ठिकाणी तयारीला वेग आला आहे. राज्यपाल कोश्यारी हे ३ फे ब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जानेवारीतच त्यांचा दौरा निश्चित झाला होता. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तो स्थगित करण्यात आला. फेब्रुवारीत राज्यपाल सुरगाणा तालुक्यातील बोरमाळ येथे भेट देणार आहेत.

बोरमाळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत काजू प्रक्रि या उद्योग सुरू के ला आहे. या माध्यमातून परिसरातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, बचत गटातील सदस्या यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबली असून टाळेबंदीच्या काळात नवा रोजगार मिळाल्याने येथील अर्थचक्र  सक्रि य राहिले. तसेच राज्यातील पहिले गुलाबी गाव अशीही या गावाची ओळख आहे.

या गावात मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी घराच्या भिंती गुलाबी रंगाने रंगविल्या आहेत. तसेच या ठिकाणी देशी गोशाळा सुरू करण्यात आली आहे. या गोशाळेत परिसरातील बचत गटाच्या महिला, मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी गाईंचे शेण, गोमूत्र यापासून १९ प्रकारची औषधे तयार करण्यात येत आहेत. याशिवाय गवरी किं वा अन्य सामान तयार करण्यात येत असून त्या ठिकाणाहून त्याचे विपणन होत आहे. राज्यपाल आपल्या दौऱ्यात या दोन्ही कें द्रांना भेट देणार असून त्यानंतर सटाणा येथील देवमामलेदार संस्थानला भेट देणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 1:37 am

Web Title: governor bhagat singh koshyari on a tour of nashik district on february 3 zws 70
Next Stories
1 वाहनाच्या धडकेने बिबटय़ाचा मृत्यू
2 उत्तर महाराष्ट्रात पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक तडजोडींना यश
3 बहुतांश ग्रामपंचायतीत युवावर्गास संधी
Just Now!
X