10 April 2020

News Flash

गंगापूर पर्यटन संकुलातील प्रकल्प लवकरच कार्यान्वित

कलाग्राम प्रकल्प केवळ १० टक्के काम बाकी असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. 

पालकमंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही

नाशिक : आघाडी सरकारच्या काळातील पूर्ण केलेली तसेच अंतिम टप्प्यात असलेली कामे पाच वर्षांच्या काळात रखडविली गेल्याचे चित्र जिल्हा परिसरात आहे. त्यापैकी गंगापूर येथील मेगा पर्यटन संकुलातील बोटक्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, मनोरंजन पार्क यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्प  सुरु करण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

शुक्रवारी भुजबळ यांनी गंगापूर मेगा पर्यटन संकुलातील गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्पाची पाहणी करून सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आदेश दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अलका वाघ, कार्यकारी अभियंता सागर शिंदे तसेच पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नाशिक जिल्हा नियोजन बैठकीत नाशिकच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबत निधीची तरतूद केल्यानंतर भुजबळ यांनी गंगापूर येथील मेगा पर्यटन संकुलातील प्रकल्पांमधील त्रुटी, अपुरी कामे याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी भुजबळ यांनी नाशिक शहर आणि जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या मेगापर्यटन संकुलातील प्रकल्प पूर्ण असतांना तसेच यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्प केवळ १० टक्के काम बाकी असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला.  नाशिकच्या बोट क्लबच्या रचनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. या प्रकल्पात प्रदूषणविरहीत ४० बोटी अमेरिकेतून आणल्या गेल्या. मात्र त्यातील काही बोटी मागील सरकारच्या काळात स्थलांतरीत झाल्या. उर्वरित बोटी येथील लोकांनी सुरक्षितपणे ठेवल्या आहेत. त्याची तपासणी करून त्या उपयोगात आणल्या जातील.  तसेच नव्याने काही बोटींची आवश्यकता असेल तर त्या आणल्या जातील. त्यासाठी अनुभवी लोकांची मदत घेतली जाईल. हा राज्यातील एक नंबरचा बोट क्लब असेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.  कलाग्रामची साफसफाई तसेच डागडुजीची कामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे प्रकल्प सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे याठिकाणी पैसा उपलब्ध होणार असून यातून अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे. कलाग्रामच्या माध्यमातून राज्यातील, परराज्यातील तसेच स्थानिकाना आपल्या वस्तू विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजार पेठ उपलब्ध होणार आहे. बाहेरून पर्यटनासाठी आलेले पर्यटक हे या मेगापर्यटन संकुलाचा लाभ घेऊन दोन-तीन दिवस नाशिकमध्ये वास्तव्य करू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 12:20 am

Web Title: guardian minister chhagan bhujbal testimony akp 94
Next Stories
1 गुन्हे वृत्त : मंगळसूत्र खेचून पलायन केल्याच्या दोन घटना
2 ‘देहदान’ जनजागृतीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
3 गोदावरी स्वच्छतेशिवाय नाशिक स्मार्ट होणे अशक्य
Just Now!
X