खगोल अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांचे मत

नाशिक : कृष्णविवराचा अभ्यास अनेक दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्याच्या आसपास भौतिकशास्त्राचे नेहमीचे नियम लागू पडत नाहीत. त्यामुळे त्याचा अभ्यास हा नेहमीच आव्हानात्मक ठरतो. नुकत्याच घेतलेल्या प्रतिमेमुळे या अभ्यासाला मोठीच मदत होईल. आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी ही प्रतिमा महत्त्वाची असल्याचे मत येथील खगोल अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी मांडले आहे.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

कृष्णविवर म्हणजे खगोलशास्त्रातील एक अत्यंत गूढ . ही विवरे कशी तयार होतात हे जाणून घेणे खूपच रंजक आहे. आपण रात्रीच्या आकाशात अनेक तारे पाहतो. गंमत म्हणजे मानवाप्रमाणेच ताऱ्यांचेही एक जीवनचR  असते. ते जन्म घेतात, प्रौढ होतात आणि शेवटी मृत्यू पावतात. विशेष गोष्ट म्हणजे माणसाचे त्याच्या मृत्यूनंतर काय होते ते आपल्याला नक्की माहीत नाही. पण ताऱ्यांचे काय होते ते मात्र माहीत झाले आहे. तुलनेने वजनदार असलेले तारे त्यांचा शेवट जवळ आला की प्रचंड आकुंचन पावतात. त्यांचे गुरुत्वाकर्षण प्रचंड प्रमाणात वाढते. ते इतके वाढते की, असे तारे प्रकाशालाही खेचून घेतात. त्यामुळे तो प्रदेश काळा दिसतो. त्यालाच आपण कृष्णविवर म्हणतो, असे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

अशा ताऱ्यांपासून प्रकाश बाहेर पडत नसल्याने त्याचे प्रत्यक्ष छायाचित्र घेणे अशक्य असते. त्यामुळे आतापर्यंत अप्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारानेच कृष्णविवराचे अस्तित्व सिद्ध केले जात होते. परंतु युरोपिअन सदर्न वेधशाळेने याबाबत नुकताच एक मैलाचा दगड पार केला आहे. या पाश्र्वभूमीवर, पिंपळे यांनी कृष्ण विवर म्हणजे काय, छायाचित्र घेण्याची प्रक्रिया, अभ्यासात  त्याचे महत्व आदींवर प्रकाशझोत टाकला आहे.

‘इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप’ नावाच्या एका भल्यामोठय़ा रेडिओ दुर्बिणीच्या मदतीने कृष्ण विवराची प्रतिमा घेण्यात आली. खगोलशास्त्राच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडली आहे. ही दुर्बीण म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर आठ ठिकाणी बसविलेल्या विशाल दुर्बिणींचे जाळे आहे. ज्या कृष्णविवराची प्रतिमा घेण्यात आली, ते आपल्यापासून ५.५ कोटी प्रकाश वर्षे इतक्या प्रचंड अंतरावर आहे. त्याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या ६.५ अब्ज पट आहे. म्हणजे हे एक महाकाय विवर आहे. मेसियार-८७ या नावाने ओळखली जाणारी एक दीर्घिका आहे. तिच्या केंद्रस्थानी हे कृष्णविवर आहे. जगभरातील सुमारे २०० शास्त्रज्ञ या संशोधनात सहभागी झाले असल्याची माहितीही डॉ. पिंपळे यांनी दिली.