News Flash

नाशिक सायकलिस्टतर्फे उद्या ‘हेरिटेज सायकल राइड’

पंचवटीतील काळाराम मंदिर, गंगाघाट अशा ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाणी हे सायकलिस्ट भेट देणार आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या वतीने २४ जानेवारी रोजी येथे ‘हेरिटेज सायकल राइड’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी पावणेसात वाजता कॉलेज रोड येथील श्रद्धा पेट्रोल पंपाजवळून या फेरीला सुरुवात होणार आहे. पंचवटीतील काळाराम मंदिर, गंगाघाट अशा ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाणी हे सायकलिस्ट भेट देणार आहेत. सायकलिंगच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ठिकाणांना भेट देत त्यांच्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि ‘इंधन वाचवा, सायकल वाचवा’ हा संदेश देण्यासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी पर्यटन विकास महामंडळाचे पराग जैन तसेच काही वास्तुविशारद सहभागी होणार आहेत. या विशेष फेरीमध्ये शहरातील सायकलिस्टनी अधिक प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन नाशिक सायकलिस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:20 am

Web Title: heritage bicycle ride in nashik
Next Stories
1 नाशिक जिल्ह्याचा आदिवासी उपयोजना प्रारूप आराखडा मंजूर
2 नाशिकचा पारा थोडा उंचावला; पण गारवा कायम
3 मालेगावात बेकायदा नळजोडणीविरुद्धच्या कारवाईला यश
Just Now!
X