करोनाचा विळखा घट्ट होण्याची भीती; सामाजिक अंतरपथ्य नियम पायदळी

नाशिक :  शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, नाशिकरोड, सिडकोसह अन्य ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे सामाजिक अंतर पथ्य नियमांचा विसर अनेकांना पडला आहे. काही दिवसांपासून कमी होणारा करोनाचा प्रादुर्भाव या गर्दीमुळे पुन्हा वाढेल की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दिवाळीवर यंदा करोनाचे सावट असले तरी बाजारपेठेत त्याचा यत्किं चतही परिणाम दिसून येत नाही. दिवाळीच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर नाशिककर बाहेर पडल्याने सर्वच दुकानांमध्ये तुडुंब गर्दी दिसत आहे. शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा परिसरात लहान विक्र ेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने परिसरात खरेदी करताना वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने पोलिसांनी या परिसरात वाहनांना बंदी के ली आहे.

दुकानदार थेट रस्त्याच्या मधोमध माल विक्रीसाठी ठेवत असल्याने कोंडी होतच आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारी खतावणी, के रसुणी, लाह्या, बत्तासे आदी सामान घेण्यासाठी महिलावर्ग रविवार कारंजावर गर्दी करीत आहेत. सध्या सर्व काही ऑनलाइन अशी परिस्थिती असली तरी लक्ष्मीपूजनाला खतावणी, हिशेबवहीचे महत्त्व लक्षात घेता ग्राहकांसाठी पाकिटात ठेवता येतील एवढय़ा कमी आकाराच्या वह्य़ांपासून मोठय़ा आकारातील खतावण्या, नोंद वही घेण्यासाठी नागरिक दुकानांमध्येच जात आहेत. याशिवाय रांगोळी, वेगवेगळ्या आकारातील मातीच्या पणत्या, पाण्यातील आकर्षक दिवे बाजारात आहेत. आकाश कं दिलांमध्ये बांबू, कागदी, खणाचे असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. महापालिका प्रशासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांना मुखपट्टी असल्याशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये असे बजावले आहे. त्यासाठी दुकानांमध्ये नो मास्क-नो एण्ट्रीचे फलक लावले आहेत. बहुतेक दुकानांमध्ये सॅनिटायझरच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, सर्वच दुकानांमध्ये गर्दी होत असल्याने विक्रे त्यांना सामाजिक अंतर पथ्य पाळणे अशक्य होत आहे.

दुसरीकडे प्रशासनाकडून प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी आवाहन करण्यात आले आहे. मात्र  नागरिकांनी या इशाऱ्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष के लेले दिसते. फटाका दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी आहे. फटाक्यांच्या दरात मागील वर्षांच्या तुलनेत वाढ नसल्याचे विक्रे ते जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.