29 March 2020

News Flash

वकील परिषदेत शंभर न्यायाधीशांचा सहभाग

न्यायालय प्रांगणात परिषदेसाठी दोन मुख्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते आज उद्घाटन, चार हजार वकिलांचा सहभाग

नाशिक : महाराष्ट्र-गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघ यांच्यावतीने १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी  पहिल्या राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नाशिकमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निमित्ताने एकाचवेळी सुमारे १०० न्यायमूर्ती आणि न्यायाधिश शहरात येणार आहेत. राज्यातील चार हजार वकील परिषदेत सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.

न्यायालय प्रांगणात परिषदेसाठी दोन मुख्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, केंद्र सरकारचे ‘सॉलिसिटर जनरल’ तुषार मेहता, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमानंतर परिषदेत मुख्य विषयांवर चर्चा होईल. दुसऱ्या सत्रात राज्यातील ३० ज्येष्ठ वकिलांना ‘ज्येष्ठ विधिज्ज्ञ’ हा किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील वकिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून  परिषदेचा समारोप माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे आदींच्या उपस्थितीत होणार आहे वकिलांसाठी पुढील पाच वर्षांच्या कामकाजाचा आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्याचा समावेश असणारे ‘व्हिजन डॉक्युमेंट’देखील प्रकाशित करण्यात आले आहे.

या निमित्ताने १०० न्यायमूर्ती-न्यायाधीश आणि सुमारे चार हजार वकील उपस्थित राहणार असल्याचे वकील परिषदेचे मुख्य समन्वयक अ‍ॅड. जयंत जायभावे आणि नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र वकील संघाच्या इतिहासात प्रथमच या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वाहनांसाठी छत्रपती शिवाजी स्टेडिअम, भालेकर, इदगाह मैदानाचा वापर केला जाईल. या निमित्ताने परिसरात जुनी नाणी, टपाल तिकिटांचे प्रदर्शन, राज्यातील वकील संघांच्या पदाधिकाऱ्यांना छायाचित्र काढून तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

विविध विषयांवर मंथन होणार

वकील परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर मंथन होणार आहे. यामध्ये ‘जलद न्यायदान हा पक्षकाराचा मूलभूत अधिकार आहे-अमलबजावणीसाठी माध्यमे आणि उपाय’, ‘सर्वोच्च न्यायालय ते जिल्हा पातळीवरील न्यायालयाचे विकेंद्रीकरण होणे ही काळाची गरज आहे’, ‘सक्षम, प्रभावी आणि मोफत कायदा सहाय्य – मूलभूत अधिकार’ आणि ‘वकिली व्यवसायापुढील नवीन आव्हाने आणि उपाय’ आदींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:12 am

Web Title: hundreds of judges participated in the lawyers conference akp 94
Next Stories
1 टवाळखोरांच्या विरोधात ‘मनसे’चे फिरते पथक
2 पाच दिवसांचा आठवडा अडचणीचा
3 महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’
Just Now!
X