News Flash

नाशिकमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

सातपूर परिसरातील मायको ते शिवनेरी चौकापर्यंत रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे १५ ते २० कार व दुचाक्यांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली.

नाशिक शहरातील सातपूर परिसरात अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली.

नाशिक शहरात वाहनांची तोडफोड करण्याची आणखी एक घटना बुधवारी घडली. शहरातील सातपूर परिसरात अज्ञात लोकांनी १५ ते २० दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये गाडयांची तोडफोड  करणे व जाळण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येते. पोलीसांकडून तोडफोड करणारया अज्ञातांचा शोध सुरू आहे.
सातपूर परिसरातील मायको ते शिवनेरी चौकापर्यंत रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे १५ ते २० कार व दुचाक्यांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड करण्याचे प्रमाण कमी झाले होते. बुधवारी पुन्हा झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड, सिन्नर फाटा, पंचवटी काही शहरांमध्ये दुचाकी व कार तोडफोड करण्याचे प्रकार वारंवार घडतात. नुकतेच पिंपरीमध्ये काही स्थानिक गुंडांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी आठ ते दहा वाहनांची तोडफोड केली होती. सिडको आणि सातपूर परिसरात वाहन जाळपोळीसह तोडफोडीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. पोलीसांकडून कारवाई होऊनही वाहन तोडफोडीचे प्रकार कमी झालेले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 1:33 pm

Web Title: in nashik unknown person break vehicles
Next Stories
1 प्रयोगशाळेमुळे सायबर गुन्ह्य़ांचा वेगाने तपास शक्य
2 स्थानिक शिक्षण व्यवस्थेबद्दल परदेशी अभ्यासकांनाही प्रश्न
3 चोरटय़ाकडून १० मोटारसायकली हस्तगत
Just Now!
X