22 September 2020

News Flash

अपक्षांना शिटी, बॅट, कप-बशी..

शिवसेनेच्या एकच चिन्ह मागणीला या चिन्ह वाटपात ‘खो’ बसल्याचे दिसून आले.

महापालिका कार्यालयात मुक्त चिन्हांची निवड करताना उमेदवार.

पुरस्कृत उमेदवारांच्या एक चिन्ह मागणीला खो; काही प्रभागात १० ते ११ मुक्त चिन्हांचे वाटप

महापालिकेच्या िरगणात असलेल्या पक्षीय आणि अपक्ष अशा एकूण ८२१ उमेदवारांना निवडणूक चिन्हवाटपाची प्रक्रिया बुधवारी पूर्णत्वास गेली. अपक्ष उमेदवारांसाठी एकूण ४८ मुक्त चिन्हे उपलब्ध होती. नारळ, कपबशी, पंखा यांसारख्या विशिष्ट चिन्हांना मोठी मागणी होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिटी, बॅट, कप-बशी, गॅस सिलिंडर, दूरचित्रवाणी संच, पत्रपेटी, पाव (ब्रेड), इस्त्री, टोपी अशी चिन्हे प्राधान्यक्रमाने वितरित झाली. काही प्रभागात एकाच जागेसाठी अपक्षांना १० ते ११ मुक्त चिन्हांचे वाटप करावे लागले. एबी फॉर्मच्या घोळामुळे अपक्ष ठरलेल्या शिवसेना, भाजप पुरस्कृत उमेदवारांना एकच चिन्ह मिळाले नाही. शिवसेनेच्या एकच चिन्ह मागणीला या चिन्ह वाटपात ‘खो’ बसल्याचे दिसून आले.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते माघारीच्या मुदतीपर्यंत अनेक नाटय़पूर्ण घडामोडी घडल्या. छाननी प्रक्रियेत शिवसेनेच्या दहा उमेदवारांचे अर्ज पक्षाचे उमेदवार न ठरता अपक्ष म्हणून ग्राह्य़ धरण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक चार व ३० मधील आणि प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवारांचा समावेश आहे. ज्या प्रभागांमध्ये एबी फॉर्मचा गोंधळ झाला, तिथे संबंधित उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत करणार आहे. या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे, असा सेनेचा प्रयत्न होता. त्यासाठी सेनेचे सचिव खा. अनिल देसाई यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली होती; परंतु त्यांची ही मागणी अमान्य झाली आहे. संजय चव्हाण, नीलेश चव्हाण, रशिदा शेख आणि शकुंतला खोडे, अरविंद शेळके, सतीश खैरनार, भगवान भोगे यांना काही अपवाद वगळता वेगवेगळी मुक्त चिन्हे दिली गेली. अपक्ष हणून रिंगणात उतरणाऱ्यांनी चिन्हांबाबत आपला पसंतीक्रम नोंदवलेला असतो. सेनेच्या पुरस्कृत उमेदवारांना ती संधीदेखील नव्हती. चिन्हवाटप प्रक्रियेत अपक्षांना प्रथम चिन्हवाटप झाले. त्यानंतर सेनेच्या गोंधळ झालेल्या उमेदवारांना चिन्हे वितरित केली गेली. पंचवटीतील एकाच प्रभागातील सेना पुरस्कृत भगवान भोगे यांनी टोपी हे चिन्ह घेतले तर लक्ष्मीबाई ताठे यांना पंखा हे चिन्ह मिळाले. काही उमेदवारांना समान चिन्ह मिळाल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

पक्षीय उमेदवारांना अधिकृत पक्ष चिन्हांचे वाटप झाले. किमान पाच ते कमाल १५ इतकी प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या आहे. भाजपमधून बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनी ‘चाय पे चर्चा’च्या संदर्भाने कप-बशी हे चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते चिन्ह त्याच प्रभागातील अन्य उमेदवाराला दिले गेले असल्याने त्यांना दुसरा पर्याय स्वीकारावा लागला. प्रभाग क्रमांक १२ बमधून निवडणूक लढविणारे सुरेश पाटील यांना कप-बशीऐवजी दूरचित्रवाणी संच हे चिन्ह घ्यावे लागले. या प्रक्रियेत एकाच चिन्हावर दावा करणारे अनेक अपक्ष उमेदवार होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकषानुसार सोडत घेऊन त्यांचे वितरण झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:39 am

Web Title: independents candidates
Next Stories
1 शौचालय नसल्याने भाजप उमेदवार रिंगणाबाहेर
2 प्रमाण भाषेसह बोली भाषाही महत्त्वाची!
3 अर्ज माघारीसाठी विनवणी, दमदाटी
Just Now!
X