जमिनीच्या व्यवहारात दहा लाखांना गंडा

नाशिक : आपल्या कामगिरीने जिल्ह्य़ाचे नाव आंतरराष्टीय पातळीवर पोहोचविणारी धावपटू कविता राऊत-तुंगार यांची जमिनीच्या व्यवहारात १० लाख रुपयांना फसवणूक झाली आहे. या संदर्भात राऊत यांनी केलेल्या तक्रारीनुसार घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Mumbai, Cyber ​​fraud, Taddeo,
मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला
April 2024 Bank Holidays List in Marathi
April 2024 Bank Holidays: ३० एप्रिलपर्यंत ‘हे’ ८ दिवस महाराष्ट्रात बँक असणार बंद; पाहा सुट्ट्यांचा तक्ता

राऊत यांना २०१० मध्ये राष्ट्रकूल तथा अशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळाले होते. या यशानंतर केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना काही रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. राऊत यांच्याकडे असलेल्या पैशांचा अंदाज घेत संशयित पद्माकर घुमरे (रा. उंबरखेड) हा राऊत सराव करत असलेल्या भोसला विद्यालयाच्या मैदानावर आला. त्यावेळी प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचा विद्यार्थी असल्याची ओळख दाखवित इगतपुरी येथील शेवगेडांग येथे जमीन घेऊन देतो, असे सांगितले.

त्यासाठी किसन शिद यांची २.६८ हेक्टर जमीनही दाखवली. हा व्यवहार १० लाख रुपयांमध्ये ठरला. व्यवहार ठरल्यानंतर घुमरे याने तीन लाख आणि दोन लाख रुपयांचा धनादेश शिद याच्या खात्यावर, तर पाच लाख रोख रक्कम घुमरे याने घेतली.

दरम्यान, पुढील काळात राऊत सरावासाठी केनिया येथे २०११ ते २०१२ गेल्या. यामुळे जमिनीचा साठेखत आणि खरेदीखत करारनामा करण्यात विलंब झाला. केनियाहून आल्यावर घुमरे याच्याशी जमिनीचा व्यवहार पूर्ण करून देण्यास त्यांनी सांगितले असता तो टाळाटाळ करू लागला. शिद यानेही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. शिद आणि घुमरे यांनी केलेल्या फसवणुकीविरोधात घोटी पोलीस ठाण्यात राऊत यांनी तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.